IND vs BAN, Asia Cup 2023: आशिया चषक २०२३च्या शेवटच्या सुपर-४ सामन्यात भारताला बांगलादेशविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या सुरू असलेल्या आशिया चषकात भारताचा हा पहिलाच पराभव आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत २६५ धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाचा डाव २५९ धावांवर आटोपला आणि सहा धावांनी सामना गमावला. २०१२नंतर बांगलादेशने भारताला आशिया चषकात पराभूत केले. त्यांचा हा टीम इंडियाविरुद्ध दुसरा विजय आहे. शुबमन गिलची शतकी खेळी भारताला पराभवापासून वाचवू शकली नाही.

बांगलादेशने भारताचा पराभव केला

बांगलादेशने भारताचा सहा धावांनी पराभव केला आहे. या आशिया चषकात भारताचा हा पहिलाच पराभव आहे. मात्र, स्पर्धेच्या दृष्टिकोनातून या सामन्याचे महत्त्व नव्हते आणि टीम इंडिया १७ सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे. त्याचवेळी या विजयासह बांगलादेशचा प्रवास संपला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने आठ गडी गमावून २६५ धावा केल्या. कर्णधार शाकिब अल हसनने सर्वाधिक ८० धावांचे योगदान दिले. तौहीद हृदयॉयने ५४ आणि नसूम अहमदने ४४ धावा केल्या. भारताकडून शार्दुल ठाकूरने तीन आणि मोहम्मद शमीने दोन विकेट्स घेतल्या. प्रसिद्ध, अक्षर आणि जडेजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
Afghanistan Batter Rahmanullah Gurbaj Surpasses Virat Kohli in Youngest to 8 Hundreds in Mens ODI Equals Sachin Tendulkar Record
AFG vs BAN: अफगाणिस्तानच्या फलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी, विराट कोहलीला मागे टाकलं तर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची केली बरोबरी

बांगलादेशने आशिया चषकात भारतावर एकमेव विजय २०१२ साली मिळवला होता आणि ११ वर्षानंतर भारतावर त्यांनी विजय मिळवला. या पराभवामुळे टीम इंडियाची नंबर १ बनण्याची संधी गेली. २०१२ साली देखील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शतक (११४ धावा) ठोकले होते आणि तीन धावांनी पराभव झाला होता. आजच्या सामन्यातही शुबमन गिलने शानदार शतक केले आणि सहा धावांनी पराभव झाला.

हेही वाचा: IND vs BAN, Asia Cup: एक अकेला सब पे भारी! शुबमन गिलचे झुंजार शतक, वन डेमध्ये केल्या हजार धावा पूर्ण

२६६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ सर्व १० गडी गमावून २५९ धावाच करू शकला. शुबमन गिलने १२१ धावांची शानदार खेळी केली, पण त्याला कोणाचीही साथ मिळाली नाही. ४२ धावा करणारा अक्षर दुसरा सर्वोत्तम धावा करणारा ठरला. बांगलादेशकडून मुस्तफिजुर रहमानने तीन बळी घेतले. महेदी हसन आणि तनझिम हसन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. शाकिब आणि मेहदीने प्रत्येकी एक विकेट घेतली. सूर्यकुमार यादव (२६) आणि शुबमन यांनी ४५ धावांची भागीदारी केली खरी, परंतु सूर्याला फिरकीपटूंना स्वीप मारण्याचा मोह काही आवरता आला नाही आणि तो त्रिफळाचीत झाला. भारतीय संघ १७ सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध आशिया चषकमधील अंतिम सामना खेळणार आहे.