IND vs BAN Champions Trophy 2025 Highlights: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये भारतीय संघाने बांगलादेशविरूद्धच्या सामन्याने मोहिमेला विजयी सुरूवात केली आहे. भारताचा हा सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडिमयवर खेळवला गेला. या सामन्यात शुबमन गिलचे शतक आणि मोहम्मद शमीच्या ५ विकेट्सच्या जोरावर भारताने बांगलादेशचा ६ विकेट्सने पराभव केला. शुबमन गिल शतक झळकावत शेवटपर्यंत नाबाद राहिला. तर रोहित शर्मा (४१) आणि केएल राहुल (४१) यांनी चांगली फलंदाजी केली. भारताने विजयाने सुरूवात करत अ गटातील गुणतालिकेत आपले खाते उघडले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates
21:55 (IST) 20 Feb 2025
IND vs BAN Live Score : केएल राहुलने बांगलादेशविरुद्ध ठोकला विजयी षटकार! शुबमन गिलने ICC स्पर्धेत झळकावलं पहिलंवहिलं शतक

शुभमन गिलच्या आयसीसी स्पर्धेतील पहिल्यावहिल्या शतकाच्या जोरावर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा सहा विकेट्सने पराभव केला. केएल राहुलने विजयी षटकार मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. तत्पूर्वी मोहम्मद शमीच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत बांगलादेशला ४९.४ षटकांत २२८ धावांवर रोखले. प्रत्युत्तरात, गिलच्या १२९ चेंडूत नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद १०१ धावांच्या खेळीमुळे भारताने ४६.३ षटकांत चार गडी गमावून २३१ धावा करून सामना जिंकला. अशाप्रकारे भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीमधील आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली.

https://twitter.com/BCCI/status/1892611947469717708

लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा आणि गिलने भारताला चांगली सुरुवात करून दिली, परंतु रोहित ४१ धावा करून बाद झाला. यानंतर संघाने विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांच्या विकेट गमावल्या. कोहलीने २२ धावा, श्रेयसने १५ आणि अक्षरने आठ धावा केल्या. यानंतर, केएल राहुलने गिलसोबत पाचव्या विकेटसाठी ८७ धावांची नाबाद भागीदारी केली. केएल राहुलने ४७ चेंडूत एक चौकार आणि दोन षटकारांसह ४१ धावा काढल्या आणि नाबाद राहिला. बांगलादेशकडून रिशाद हुसेनने दोन तर तस्किन अहमद आणि मुस्तफिजूर रहमानने प्रत्येकी एक विकेट घेतली.

तत्पूर्वी, बांगलादेशने तौहीद हृदयॉयच्या शतक आणि झाकीर अलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतासमोर विजयासाठी २२९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना, बांगलादेशची परिस्थिती एकेकाळी वाईट होती आणि त्यांनी फक्त ३५ धावांमध्ये पाच विकेट्स गमावल्या होत्या, परंतु झाकीर आणि हृदयॉय यांनी एक शानदार भागीदारी करून बांगलादेशचा डाव सावरला. या दोघांच्या भागीदारीमुळे बांगलादेशला ४९.४ षटकांत २२८ धावा करता आल्या. ११८ चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने १०० धावा काढल्यानंतर हृदयॉय पॅव्हेलियनमध्ये परतला.

भारताकडून मोहम्मद शमीच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. शमीने सामन्यात पाच विकेट्स घेतल्या, तर हर्षित राणाने तीन आणि फिरकीपटू अक्षर पटेलने दोन विकेट्स घेतल्या. या दरम्यान शमीने एकदिवसीय सामन्यांमध्ये २०० विकेट्स पूर्ण केले. बांगलादेशकडून तौहीद व्यतिरिक्त झाकीरने ११४ चेंडूत चार चौकारांसह ६८ धावा केल्या. तौहीद आणि हृदयॉय वगळता बांगलादेशच्या इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यांच्या चार फलंदाजांना त्यांचे खातेही उघडता आले नाही, तर तीन खेळाडूंना दुहेरी आकडा गाठता आला नाही. तन्जीद हसनने २५ आणि रिशाद हुसेनने १८ धावांचे योगदान दिले.

21:48 (IST) 20 Feb 2025

IND vs BAN Live Score : शुबमन गिलने आयसीसी स्पर्धेत झळकावलं पहिलंवहिलं शतक

शुबमन गिलने आयसीसी स्पर्धेत झळकावलं पहिलंवहिलं शतक

शुबमन गिलने १२५ चेंडूंत आयसीसी स्पर्धेतील पहिलंवहिलं शतक झळकावलं आलं आहे. हे त्याच्या वनडे कारकीर्दीतील आठवं शतक आहे. या खेळीत त्याने ९ चौकार आणि दोन षटकार मारले.
21:21 (IST) 20 Feb 2025

IND vs BAN Live Score : राहुलची कॅच ड्रॉप

तस्कीनच्या ३७ व्या षटकात जकिर अलीने सीमारेषेजवळ केएल राहुलचा झेल सोडला. हा झेल सोडल्यानंतर भारताल विजयासाठी ५७ धावांची गरज होती. यानंतर राहुलने ३९ व्या षटकात षटकार लगावत त्या झेलची किंमत काय होती हे दाखवून दिली.

20:43 (IST) 20 Feb 2025

IND vs BAN Live Score : भारताला दोन धक्के

भारताला विराट कोहलीनंतर काही वेळातच तिसरा धक्का बसला. श्रेयस अय्यर अवघ्या १५ धावा करत बाद झाला. श्रेयसनंतर अक्षर पटेलही झटपट बाद झाला. यानंतर आता भारतीय संघ थोडा पेचात अडकला आहे. भारताला विजयासाठी ८५ धावांची गरज आहे, पण त्याकरिता भारताला एका चांगल्या भागीदारीची गरज आहे. बांगलादेशचा फिरकी गोलंदाज रिशादने खेळाडूंना त्रास दिला आहे.

20:22 (IST) 20 Feb 2025

IND vs BAN Live Score : शुबमन गिलचं अर्धशतक

भारताचा नवा उपकर्णधार शुबमन गिल जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने हा फॉर्म कायम ठेवत चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावले. गिलने ७० चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले.

20:15 (IST) 20 Feb 2025

IND vs BAN Live Score : रोहित शर्मानंतर विराट कोहली बाद

रोहित शर्मानंतर विराट कोहली २२ धावा करत बाद झाला. विराट आणि गिलने मिळून भारताची धावसंख्या १०० पार नेली. पण विराट कोहली फार काळ मैदानावर टिकू शकला नाही. भारताला आता विजयासाठी २७ षटकांत ११२ धावांची गरज आहे.

19:30 (IST) 20 Feb 2025
IND vs BAN Live Score : भारताला पहिला धक्का! रोहित शर्माचं अर्धशतक हुकलं

भारतीय कर्णधार रोहित शर्मा चांगली खेळी केल्यानंतर बाद झाला आहे. रोहित आणि शुबमन गिल यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. या काळात रोहितने एकदिवसीय सामन्यांमध्ये ११००० धावा पूर्ण केल्या. रोहित अर्धशतकाकडे वाटचाल करत होता पण मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली. रोहित ३६ चेंडूत सात चौकारांसह ४१ धावा काढून बाद झाला. भारताने १० षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात ६९ धावा केल्या आहेत.

19:19 (IST) 20 Feb 2025
IND vs BAN Live Score : भारताची धावसंख्या ५० धावांच्या पार

टीम इंडियाचा स्कोअर ८ षटकांत ५० च्या पुढे गेला आहे. रोहित शर्मा ३१ चेंडूत ३७ धावांवर खेळत आहे. त्याने सात चौकार मारले आहेत. शुभमन गिल १७ चेंडूत तीन चौकारांसह १४ धावांवर खेळत आहे. भारताचा स्कोअर कोणताही विकेट न घेता ५१ धावा आहे.

18:46 (IST) 20 Feb 2025

IND vs BAN Live Score : रोहित-गिलची जोडी मैदानावर

रोहित शर्मा आणि शुबमन गिलची जोडी २२९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरली आहे. गिलने पहिल्याच षटकात चौकार मारत चांगली सुरूवात करून दिली.

18:14 (IST) 20 Feb 2025

IND vs BAN Live Score : बांगलादेश ऑलआऊट

बांगलादेशचा संघ ४९.४ षटकांत २२८ धावा करत सर्वबाद झाले. ३० षटकांत ५ विकेट्स गमावून १०० धावा केल्यानंतर बांगलादेशच्या तौहिद ह्रदय आणि जाकिर अलीच्या १५० धावांच्या भागीदारीने बांगलादेशला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात मदत केली. भारताच्या गोलंदाजांनीही उत्कृष्ट कामगिरी करत बांगलादेशच्या धावांवर अंकुश ठेवला. तौहिद ह्रदयने शतक झळकावले. तर मोहम्मद शमीने ५ विकेट्स घेतल्या. भारताला आता विजयासाठी २२९ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

18:10 (IST) 20 Feb 2025

IND vs BAN Live Score : मोहम्मद शमीचे ५ विकेट्स

मोहम्मद शमीने ४९ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर तस्किन अहमदला झेलबाद शमीने पाच विकेट्स पूर्ण केले. शमीचा वनडेमधील हा सहावा पाच विकेट हॉल आहे. शमीने १० षटकांत ५३ धावा देत ५ विकेट्स घेतले.

18:09 (IST) 20 Feb 2025

IND vs BAN Live Score : तौहिद ह्रदयचे शतक

बांगलादेशचा फलंदाज तौहिद ह्रदयने संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करत आपले शतक पूर्ण केले. गरमी आणि पायात क्रॅम्प येत असूनही त्याने मैदानावर चालायलाही जमत नसताना त्याने शतक पूर्ण करत संघाचा डाव सावरला. ह्रदयने ११४ चेंडूत २ षटकार आणि ६ चौकारांसह १०० धावा पूर्ण केल्या.

17:54 (IST) 20 Feb 2025

IND vs BAN Live Score : बांगलादेशची आठवी विकेट गेली

बांगलादेशची आठवी विकेट गेली

बांगलादेशची आठवी विकेट २१५ धावांवर पडली आहे. मोहम्मद शमीने तंजीम हसन शाकिबला शून्यावर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. शमीचे हे चौथे यश आहे. दुसऱ्या बाजूला, तौहीद हृदयॉय शतकाच्या जवळ आहे. तो ९१ धावांवर खेळत आहे.

17:51 (IST) 20 Feb 2025

IND vs BAN Live Score : बांगलादेशने सातवी विकेट गमावली

बांगलादेशने सातवी विकेट गमावली

बांगलादेशचा सातवा विकेट २१४ धावांवर पडला आहे. १२ चेंडूत १८ धावा करून रिशद हुसेन बाद झाला. त्याला हर्षित राणाने बाद केले. तौहीदांची हृदये एका टोकाला दृढ उभी आहेत. तथापि, त्याच्या पायात वेदना होत आहेत.

17:41 (IST) 20 Feb 2025

IND vs BAN Live Score: शमीने तोडली भागीदारी

मोहम्मद शमीने ४३ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर जाकिर अलीला विराट कोहलीकरवी झेलबाद केले. मोहम्मद शमीने अखेरीस १५० धावांची भागीदारी रचणाऱ्या बांगलादेशची भागीदारी तोडली आहे. यासह मोहम्मद शमीने २०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. यासह बांगलादेशने ४५ षटकांत २०० धावांचा टप्पा गाठला आहे.

16:55 (IST) 20 Feb 2025
IND vs BAN Live Score: तौहिद ह्रदय-जाकिर अलीची अर्धशतकं

बांगलादेशचे मधल्या फळीतील फलंदाज तौहिद ह्रदय-जाकिर अली यांनी संघाचा डाव उचलून धरला. सर्वात आधी जाकिर अलीने ८७ चेंडूत ३ चौकारांसह ५१ धावा केल्या. तर तौहिद ह्रदयने ८६ चेंडूत ३ चौकारांसह ५४ धावा केल्या.

16:53 (IST) 20 Feb 2025

IND vs BAN Live Score: भारत वि बांगलादेश

बांगलादेशने खराब सुरूवातीनंतर तौहिद ह्रदय आणि जाकिर अली यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी मिळून ३५ षटकांत २ बाद १३२ धावा केल्या आहेत.

16:28 (IST) 20 Feb 2025

IND vs BAN Live Score:टीम इंडिया नाणेफेकीचा रेकॉर्ड

IND vs BAN : रोहित शर्माने टॉस गमावताच टीम इंडियाने केला नकोसा विक्रम, ‘या’ यादीत पोहोचला अव्वल स्थानी

16:26 (IST) 20 Feb 2025

IND vs BAN Live score: बांगलादेशच्या १०० धावा पूर्ण

बांगलादेशने झटपट ५ विकेट्स गमावल्यानंतर जाकिर अली आणि तौहिद ह्रदय यांनी चांगली भागीदारी रचत संघाची धावसंख्या १०० पार नेली आहे. बांगलादेशने २९ षटकांत ५ बाद १०३ धावांचा टप्पा गाठला आहे. तौहिद आणि जाकिर प्रत्येकी ३४ धावा करत मैदानात आहेत.

16:07 (IST) 20 Feb 2025

IND vs BAN Live score: रोहित शर्माच्या चुकीमुळे अक्षरची हॅटट्रिक हुकली

रोहित शर्माच्या एका चुकीमुळे बांगलादेशविरूद्ध सामन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीमधील अक्षर पटेलची पहिली हॅटट्रिक हुकली… पण नेमकं काय घडलं?

वाचा सविस्तर

VIDEO: सॉरी यार…, रोहित शर्मामुळे हुकली अक्षर पटेलची हॅटट्रिक, हात जोडत मागितली माफी अन् स्वत:वरच असा काढला राग
15:20 (IST) 20 Feb 2025
IND vs BAN Live score: अक्षर पटेलच्या खात्यात सलग दोन विकेट

वेगवान गोलंदाजीनंतर रोहित शर्माने फिरकीपटू म्हणून अक्षर पटेलला गोलंदाजी सोपवली. अक्षरने दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर उत्कृष्ट गोलंदाजी सलग दोन विकेट घेतले. अक्षरला तिसऱ्या चेंडूवरही विकेट घेत हॅटट्रिकची संधी मिळाली होती, पण रोहित शर्माकडून झेल सुटल्याने अक्षरची हॅटट्रिकची हुकली. अक्षरने मुश्फिकुर आणि तंझीद हसनला झेलबाद केले.

15:09 (IST) 20 Feb 2025
IND vs BAN Live score: मोहम्मद शमीची दुसरी विकेट

सामन्यातील सातव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शमीने मेहदी हसन मिराजला झेलबाद करत दुसरी विकेट मिळवली. चेंडूने बॅटची कड घेत स्लिपमध्ये उभ्या असलेल्या गिलच्या दिशेने गेला आणि शुबमन गिलने एक जबरदस्त झेल टिपला. यासह बांगलादेशचा संघ सात षटकांनंतर ३ बाद २७ धावा केल्या आहेत.

14:50 (IST) 20 Feb 2025
IND vs BAN Live score: दुसऱ्या षटकात विकेट

हर्षित राणाने दुसऱ्याच षटकात आयसीसी स्पर्धेतील पहिली विकेट मिळवली आहे. हर्षितने दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर बांगलादेशचा कर्णधार शांतो कोहलीकरवी झेलबाद झाला. यासह बांगलादेशचा संघ पहिल्या दोन षटकांत २ बाद २ धावांवर खेळत आहे.

14:43 (IST) 20 Feb 2025

IND vs BAN Live score: पहिल्याच षटकात विकेट

मोहम्मद शमीने पहिल्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला आहे. बांगलादेशने पहिल्याच चेंडूवर एक धाव घेतली आणि सौम्या सरकारला स्ट्राईक मिळाली. पण पहिल्याच चेंडूपासून सौम्या सरकारला शमीने स्थिरावू दिलं नाही. अखेरीस शमीच्या चेंडूने सौम्या सरकारच्या बॅटची कड घेत चेंडू थेट राहुलच्या हातात गेला.

14:33 (IST) 20 Feb 2025

IND vs BAN Live score: भारत बांगलादेश सामन्याला सुरूवात

चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत वि बांगलादेश सामन्याला सुरूवात झाली आहे. भारताकडून मोहम्मद शमीे गोलंदाजीला सुरूवात केली आहे. तर बांगलादेशकडून सौम्या सरकार आणि तन्झीद हसनची जोडी उतरली आहे.

14:26 (IST) 20 Feb 2025

IND vs BAN Live score: दुबईत भारताची कामगिरी कशी आहे?

भारतीय संघ दुबईत सहा एकदिवसीय सामने खेळला आहे. तो आशिया कप २०१८ मध्ये भारताने हे सर्व सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामने जिंकले आहेत तर एक सामना बरोबरीत सुटला. यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा होता.

14:14 (IST) 20 Feb 2025

IND vs BAN Live score: बांगलादेश प्लेईंग इलेव्हन

तन्झिद हसन, सौम्या सरकार, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, जाकेर अली, रिशाद हुसेन, तन्झिम हसन साकिब, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान

14:09 (IST) 20 Feb 2025

IND vs BAN Live score: भारताची प्लेईंग इलेव्हन

भारताची टॉप फलंदाजी फळी सारखीच असणार आहे. गोलंदाजीमध्ये वरूण चक्रवर्तीच्या जागी कुलदीप यादव संघाचा भाग आहे. तर अर्शदीप सिंगच्या जागी मोहम्मद शमी संघात आहे.

भारताची प्लेईंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी

14:04 (IST) 20 Feb 2025

IND vs BAN Live score:नाणेफेक

बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करताना दिसला आहे. दुबईच्या मैदानावर झालेल्या १३ सामन्यांमध्ये सर्वाधिक सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत.

13:57 (IST) 20 Feb 2025
IND vs BAN Live score: चॅम्पियन्स ट्रॉफीचा इतिहास

चॅम्पियन्स ट्रॉफीचा इतिहास वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा…

आधी २ मग ४ आणि आता तब्बल ८ वर्षांनी होतेय चॅम्पियन्स ट्रॉफी! विस्कळीत स्पर्धेची गोष्ट ठाऊक आहे का?

India vs Bangladesh Highlights: भारत वि बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या सामन्याचे हायलाईट्स