बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. अशाप्रकारे यजमान बांगलादेशने ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१ अशी आपल्या नावावर केली आहे. मात्र, या मालिकेतील शेवटचा सामना खेळायचा आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला, मात्र त्याने २८ चेंडूत नाबाद ५१ धावांची खेळी केली. टीम इंडियाच्या कर्णधाराने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ५ षटकार मारले, मात्र या शानदार खेळीनंतरही संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टीम इंडियाच्या बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, संघाने ३०-४० धावा कमी केल्या होत्या, पण सुनील गावसकर यांनी विश्वास ठेवला की भारताने ७०-८० कमी धावा केल्या आहेत आणि अशा परिस्थितीत जिंकणे कठीण आहे. गावसकर पुढे म्हणाले, “जेव्हा तुम्हाला प्रति षटकात ६ पेक्षा कमी धावा करण्याचे लक्ष्य मिळते, तेव्हा तुमच्यावरील दबाव आपोआप वाढत जातो. भारताने स्वत:ला दडपणाखाली आणले होते, त्यांनी स्वतःसाठी गोष्टी कठीण केल्या होत्या. पण मला वाटतं भारत हा सामना १७०-१८० धावांच्या दरम्यानचं हरला होता आणि त्याचवेळी जर कर्णधार रोहितने फलंदाजीला यायचे होते तर त्याचवेळी त्याने यायला हवे होते.”

आता भारतीय संघाच्या पराभवानंतर माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. वास्तविक, सुनील गावसकर म्हणाले की, “रोहित शर्मा फलंदाजीला लवकर आला नाही. रोहित शर्माने फलंदाजीला लवकर यायला हवे होते, असे मत माजी भारतीय खेळाडूचे आहे. रोहित शर्मा नवव्या क्रमांकाऐवजी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला असता तर कदाचित निकाल वेगळा लागला असता.” तसेच अष्टपैलू अक्षर पटेलच्या फलंदाजीवर सुनील गावसकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “रोहित शर्मा लवकर फलंदाजीला आला असता तर अक्षर पटेलची फलंदाजीतील भूमिका बदलता आली असती.”

हेही वाचा: IND vs BAN: टीम इंडियाला मोठा झटका! रोहित शर्मासहित तीन खेळाडू शेवटच्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर

सुनील गावसकर म्हणाले की, “जर रोहित शर्मा प्रथम फलंदाजीला आला असता तर अक्षर पटेलच्या फलंदाजीचा क्रम बदलता आला असता. दीपक चहर किंवा शार्दुल ठाकूरऐवजी अक्षर पटेलला फलंदाजीची संधी मिळाली असती.” सुनील गावसकर म्हणतात की, “रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करायला यायला हवी होती, पण भारतीय कर्णधाराला धोका न पत्करता शॉट खेळता आला असता. असे झाले असते तर भारतीय संघ हा सामना जिंकण्याची शक्यता वाढली असती, असे तो म्हणाला. विशेष म्हणजे भारतीय संघाला दुसऱ्या वनडेत बांगलादेशविरुद्ध ५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban if the batting had to come no 7 or 8 the sunil gavaskar fumes on skipper rohit sharma avw