Asian Games 2023, IND vs BAN: भारतीय फुटबॉल संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत आपला दुसरा सामना जिंकला आहे. या विजयाने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३मध्ये भारतीय फुटबॉल संघाने आव्हान कायम राखले आहे. भारताने बांगलादेशचा १-० असा पराभव केला. चीनविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाने हा सामना जिंकला आहे. सामन्यातील एकमेव गोल सुनील छेत्रीने ८५व्या मिनिटाला केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताने बांगलादेशचा १-० असा पराभव केला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय फुटबॉल संघाचा हा पहिला विजय आहे. पहिल्या सामन्यात भारताला चीनविरुद्ध १-५ अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचबरोबर बांगलादेशचा संघ सलग दुसरा सामना हरला आहे. पहिल्या सामन्यात म्यानमारने बांगलादेशचा पराभव केला. भारताकडून या सामन्यात सुनील छेत्रीने एकमेव गोल केला. त्याने ८५व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत भारताला निर्णायक आघाडी मिळवून दिली. सामन्याचा पहिला हाफ गोलशून्य होता, मात्र दुसऱ्या हाफच्या शेवटी सुनील छेत्रीच्या गोलने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. आता भारताला बाद फेरीत प्रवेश करण्याची संधी आहे.

भारतीय महिला फुटबॉल संघाने पहिला सामना १-५ने गमावला

हांगझाऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला फुटबॉल संघाला चायनीज तैपेईकडून २-१ने पराभव स्वीकारावा लागला. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. भारताने उत्तरार्धात एका गोलच्या जोरावर चायनीज तैपेईवर १-० अशी आघाडी घेतली. मात्र, सामन्याच्या शेवटच्या क्षणी चायनीज तैपेईने दोन गोल केल्याने टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. उत्तरार्धाच्या सुरुवातीला अंजू तमांगने भारताला आघाडी मिळवून दिली होती, मात्र चायनीज तैपेईने ६९व्या आणि ८७व्या मिनिटाला गोल नोंदवत विजयाची नोंद केली. चायनीज तैपेईकडून लाइ ली चिन आणि हसू यू सुआन यांनी गोल केले.

सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष फुटबॉल संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात चीनकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता आशालता देवींच्या नेतृत्वाखालील महिला फुटबॉल संघालाही हाच पराभव पाहावा लागला. या सामन्यात भारतीय संघ पहिली ६० मिनिटे आघाडीवर होता. टीम इंडिया चायनीज तैपेईला चकित करून अपसेट करेल असं वाटत होतं, पण तसं होऊ शकलं नाही. अखेरच्या काही क्षणांमध्ये भारतीय बचावपटूंच्या चुकांमुळे पराभवाला सामोरे जावे लागले.

भारतीय महिला फुटबॉल संघ जबरदस्त फॉर्ममध्ये होता आणि त्याने या वर्षी जूनमध्ये ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या पहिल्या फेरीत बलाढ्य किर्गिस्तानचा ५-० असा पराभव केला होता. भारतीय महिला संघाला ब गटात चायनीज तैपेई आणि थायलंडसह स्थान देण्यात आले आहे. आता टीम इंडियाला २४ सप्टेंबरला थायलंडशी सामना करायचा आहे. भारतासाठी हा ‘करो या मरो’चा सामना असेल. उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी थायलंडविरुद्धच्या सामन्यात विजय आवश्यक असेल.

हेही वाचा: IND vs AUS: एकदिवसीय मालिकेपूर्वी पॅट कमिन्सचे टीम इंडियाला आव्हान; म्हणाला, “विश्वचषकापूर्वी घरच्या मैदानावर…”

पाच गटांतील अव्वल संघ आणि प्रत्येक गटातील तीन सर्वोत्तम उपविजेत्या संघांना उपांत्यपूर्व फेरीसाठी म्हणजेच अंतिम आठसाठी पात्र ठरण्याची संधी मिळेल. गेल्या वेळी म्हणजे २०१८ आशियाई खेळांमध्ये टीम इंडिया ११ संघांमध्ये नवव्या स्थानावर होती. भारतीय संघाला यंदा आपली कामगिरी सुधारायची आहे. स्वीडनचे थॉमस डेनरबी हे भारतीय महिला फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आहेत. चार वर्षांपूर्वी त्यांच्या देखरेखीखाली नायजेरियाचा महिला संघ फिफा विश्वचषकाच्या १६च्या फेरीत पोहोचला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban india beat bangladesh 1 0 sunil chhetri scored the only goal of the match in the 85th minute avw
Show comments