IND vs BAN 2nd T20I Match Playing XI and Pitch Report : भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-२० मालिकेतील दुसरा सामना ९ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने पहिला सामना ४९ चेंडू शिल्लक असताना ७ विकेट्सनी जिंकला होता. पहिल्याच सामन्यात मयंक यादव आणि नितीश रेड्डी यांनीही भारताकडून पदार्पण केले. आता सर्वांच्या नजरा दुसऱ्या टी-२० सामन्याकडे लागल्या आहेत, जो जिंकून भारत मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेईल. सर्वप्रथम, अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी आणि भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते? जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हर्षित राणा पदार्पण करणार?

मयंक यादव आणि नितीश कुमार रेड्डी यांनी ग्वाल्हेरमध्ये भारतीय टी-२० संघात पदार्पण केले होते. आता असे मानले जात आहे की आणखी वेगवान गोलंदाज दुसऱ्या टी-२० मध्येही पदार्पण करू शकतो. हर्षित राणा त्याच्या घरच्या मैदानावर भारतासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकतो. आता प्रश्न असा येतो की हर्षित राणाच्या पदार्पणासाठी कोणत्या खेळाडूला वगळले जाईल? यामध्ये पहिले नाव समोर येत आहे ते म्हणजे नितीश कुमार रेड्डी. तो फक्त एकच सामना खेळला आहे, पण संघ व्यवस्थापन त्याला हर्षितसाठी बाहेर ठेऊ शकते. त्याच्या जागी चौथ्या क्रमांकावर रियान पराग फलंदाजी करू शकतो. पहिल्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती.

खेळपट्टीचा अहवाल –

इतिहास साक्षी आहे की अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी बहुतांशी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. या मैदानाच्या सीमारेषा लहान असल्याने चौकार-षटकार मारणे सोपे जाते. आयपीएल २०२४ मध्ये, या मैदानावर खेळल्या गेलेल्या शेवटच्या ५ सामन्यांपैकी ८ डावांमध्ये २०० किंवा त्याहून अधिक धावा झाल्या आहेत. दुसरीकडे, जसजसा सामना पुढे सरकतो, तसतशी फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीकडून मदत मिळू लागते. आंतरराष्ट्रीय सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १३९ धावांची आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला १३ सामन्यांत केवळ ४ वेळा विजय मिळवता आला आहे.

हेही वाचा – IML 2024 : सचिन-लारासह ‘हे’ दिग्गज पुन्हा एकदा मैदान गाजवण्यासाठी सज्ज! ‘या’ लीगमध्ये होणार सहभागी

दुसऱ्या सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), रियान पराग, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी/हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव.

हेही वाचा – Team India : भारताचे उपांत्य फेरीत पोहोचणे ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड सामन्यावर अवलंबून, जाणून घ्या काय आहे समीकरण?

बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ :

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban india vs bangladesh 2nd t20 match team india playing xi will change harshit rana make debut in delhi vbm