IND vs BAN Indian Cricketer Abhinav Mukund emotion post about Grandmother : बांगलादेश विरुद्ध चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने २८० धावांनी मोठा विजय नोंदवला होता. उभय संघांमधील सामना सुरू होण्यास २४ तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना भारतीय संघाचा सदस्य असलेला फलंदाज अभिनव मुकुंद दुःखात बुडाला होता. एकेकाळी भारतीय संघाचा भाग असलेल्या मुकुंदच्या आजींचे निधन झाले होते, पण जबाबदारी पार पाडण्यासाठी त्याला चेन्नईला यावे लागले.
वास्तविक, मुकुंद समालोचकाची भूमिका निभावत होता आणि सामन्यातील ब्रेक दरम्यान तो अँकरची भूमिका करत होता आणि शो होस्ट करत होता. भारताने हा सामना जिंकल्यानंतर मुकुंदने सोशल मीडिया पोस्टद्वारे आपली व्यथा मांडली आहे. आजीचा फोटो पोस्ट करत त्याने इन्स्टाग्राम पोसटमध्ये लिहिले की, “माझ्या आजीचे निधन होऊन २४ तासही झाले नव्हते, पण मला पहिल्यांदा अँकर म्हणून लाइव्ह जावे लागले. क्रिकेटर ते एक्स्पर्ट असा प्रवास आणि आता शो होस्ट करत आहे.”
‘मला चेपॉमध्ये घरी असल्यासारखे वाटले’ – अभिनव मुकुंद
अभिनव मुकुंद पुढे म्हणाला, “मी थोडा नवर्सही होतो, पण चेपॉकमध्ये मला घरी असल्यासारखे वाटले आणि या चार दिवसांचा प्रवास पूर्ण करण्यात मला यश आले. यावेळी मी अश्विनला घरच्या मैदानावर नवीन उंची गाठताना आणि दिवंगत शेन वॉर्नची बरोबरी करताना पाहिले. मी पहिल्या सामन्याचा आनंद लुटला आणि मला खात्री आहे की माझ्या आजीनेही त्याचा आनंद घेतला असेल. आता कानपूरला निघालो.”
हेही वाचा – IND vs BAN : विराटने अश्विनचं अभिनंदन करताना असं काही केलं की…VIDEO होतोय व्हायरल
अश्विनने शेन वॉर्नची बरोबरी केली –
रविचंद्रन अश्विनने चेन्नई कसोटीत ३७ वेळा पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली. अश्विनने बांगलादेशच्या दुसऱ्या डावात ८८ धावांत सहा विकेट्स घेतल्या. यासह त्याने ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नच्या विक्रमाची बरोबरी केली. कसोटीत सर्वाधिक वेळ पाच विकेट्स घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे, ज्याने कसोटीत ही कामगिरी ६७ वेळा केला आहे.
रविचंद्रन अश्विन ठरला सामनावीर –
सामन्यातील दमदार अष्टपैलू कामगिरीसाठी अश्विनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या डावात त्याने ११३ धावा केल्या होत्या. अश्विन अशा वेळी फलंदाजीला आला, जेव्हा संघाने १४४ धावांवर ६ विकेट्स गमावल्या होत्या. इथून त्याने रवींद्र जडेजासोबत सातव्या विकेटसाठी मोठी भागीदारी साकारली. अश्विनने फलंदाजीबरोबरच चेंडूनेही चांगली कामगिरी करत दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेत बांगलादेशचा डाव २३४ धावांत रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.