India vs Bangladesh, World Cup 2023: टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज के.एल. राहुलने गुरुवारी पुण्यात भारत विरुद्ध बांगलादेश विश्वचषक सामन्यादरम्यान एक शानदार झेल घेतला. त्याने मोहम्मद सिराजच्या  षटकात मेहदी हसन मिराजचा अप्रतिम झेल घेत भारताला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. मोहम्मद सिराजने लेग साईडला जाणारा लेन्थ बॉल टाकला. मेहदीने शॉट मारण्याचा प्रयत्न केला पण अयशस्वी ठरला. राहुलने डावीकडे सतत सूर मारत त्याचा झेल घेतला.

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या चेंडूवर भारतीय यष्टीरक्षकाने हा अप्रतिम झेल घेतला. सिराजने २५व्या षटकातील पहिला चेंडू बांगलादेशी फलंदाज मेहदी हसन मिराजला क्रॉस सीममधून लेग साइडच्या दिशेने टाकला, जो बांगलादेशी फलंदाजाने फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू बॅटची कड घेऊन के.एल. राहुलच्या दिशेने गेला. चेंडू राहुलच्या रेंजपासून जरी दूर असला तरी डाव्या बाजूला हवेत लांब सूर मारत त्याने अफलातून झेल घेतला.

maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
Sanju Samson Revelas Suryakumar Yadav and Gautam Gambhir Support him
Sanju Samson : ‘कारकीर्दीत बरेच चढ-उतार आले, पण…’, शतकी खेळीनंतर संजू सॅमसनने ‘या’ दोन माणसांचे मानले आभार
Australia A beat India A by 6 Wickets in in 2nd unofficial Test
IND A vs AUS A : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारताची उडाली दाणादाण, दुसऱ्या सराव सामन्यातही हार
Suryakumar Yadav and Sanju Samson fight with Marco Jansen video viral in IND vs SA 1st T20I
Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा VIDEO व्हायरल

राहुलच्या या झेलचा व्हिडीओ आयसीसीने शेअर केला आहे. “के.एल. राहुल, यू ब्यूटी” अशा कॅप्शनसह व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. याशिवाय, व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “तुम्ही काय शानदार झेल पकडला!” आता राहुलच्या या शानदार कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकेश राहुलने त्याच्या विकेटकीपिंगवर खूप मेहनत केली आहे.

कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या मंगळुरू येथील अंडर-१३ शिबिरात के.एल. राहुल जेव्हा गेला तेव्हा त्याने प्रशिक्षक जयराज यांना आपली ओळख करून दिली. “सर, मी के.एल. राहुल असून यष्टीरक्षक फलंदाज आहे.” जयराज यांनी राहुल हा एक यष्टिरक्षक म्हणून कसा होता? याबद्दलच्या आठवणी सांगितल्या. त्यांनी लोकेश राहुलची प्रतिभा ओळखली होती. त्यासाठी त्यांनी योग्य त्याच्यावर खूप मेहनत घेतली.

भारताचे फिल्डिंग प्रशिक्षक टी. दिलीप यांनी राहुलची विकेटकीपिंग सुधारण्यास खूप मदत केली. ते म्हणाले की, “राहुलमध्ये आधीच विकेटकीपिंगचे कौशल्य होते मी फक्त एक दिशा देण्याचा प्रयत्न केला.” या वर्षाच्या सुरुवातीला, दिलीप यांनी त्याच्या बद्दल मोठे विधान केले. ते म्हणाले की, “तो कधीच स्वतःचे ग्लोव्हज निवडत नाही. तो लहानपणापासून त्याच्या वेगळ्या पद्धतीने विकेटकीपिंग करतो. तो बऱ्याच गोष्टी स्वतःच्या त्यात टाकतो. काही पैलू सुधारण्याव्यतिरिक्त त्याच्या विकेटकीपिंग कौशल्यावर काम करणे फारसे अवघड नाही.” ते पुढे म्हणाले की, “साध्या ट्रक-टायरने लोकेश राहुलला त्याची विकेटकीपिंग सुधारण्यास मदत केली.”

बांगलादेशने २५६ धावा केल्या

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने आठ गडी गमावून २५६ धावा केल्या. वन डे वर्ल्ड कप २०२३ मध्ये सलग चौथा विजय मिळवण्यासाठी टीम इंडियासमोर २५७ धावांचे लक्ष्य आहे. बांगलादेशकडून लिटन दासने सर्वाधिक ६६ धावा केल्या. तर तनजीद हसनने ५१ धावांची खेळी केली. अखेरीस महमुदुल्लाहने ४६ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या २५० धावांच्या जवळ नेली. मुशफिकुर रहीमने ३८ धावांचे योगदान दिले. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी गडी बाद करण्यात यश मिळाले.

हेही वाचा: IND vs BAN: दुखापतग्रस्त हार्दिक पांड्या फलंदाजीला येणार का? स्कॅनसाठी नेले होते हॉस्पिटलमध्ये, जाणून घ्या ICCचा नियम

१३२ धावांवर भारतीय संघाची दुसरी विकेट पडली. शुबमन गिल ५५ चेंडूत ५३ धावा करून बाद झाला. मेहदी हसनच्या चेंडूवर महमुदुल्लाहने अप्रतिम झेल घेतला. आता विराट कोहलीसोबत श्रेयस अय्यर क्रीझवर आहे. २३ षटकांनंतर भारताची धावसंख्या दीडशेपार झाली आहे.