IND vs BAN T20 Series Live Streaming Updates : भारत आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिकेनंतर आता तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ६ ऑक्टोबरला ग्वाल्हेर येथे होणार आहे. दरम्यान, जर तुम्ही स्टेडियममधून जाऊन सामना पाहणार नसाल, तर तुम्हाला टीव्ही आणि मोबाईलवरच सामना पाहावा लागणार आहे. सामना सुरू होण्यापूर्वी, भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा पहिला सामना तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता? जाणून घेऊया.
भारत विरुद्ध बांगलादेश टी-२० मालिकेचे सामने कुठे पाहता येणार?
भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-२० मालिकेतील सामने तुम्ही मोबाईलवर जिओ सिनेमा आणि टीव्हीवरील स्पोर्ट्स १८ चॅनलवर पाहता येणार आहेत. खास गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे स्मार्ट टीव्ही असेल तर तुम्ही जिओ सिनेमा ॲपच्या माध्यमातून टीव्हीवरही सामना पाहू शकता. यासोबतच तुम्ही डीडी स्पोर्ट्सवर लाइव्ह सामन्याचा आनंद घेऊ शकता. मात्र यासाठी तुमच्याकडे डीडी फ्री डिश असणे आवश्यक आहे. याशिवाय इतर कोणत्याही चॅनलवर तुम्हाला सामना पाहता येणार नाही.
भारत विरुद्ध बांगलादेश टी-२० मालिकेचे वेळापत्रक –
६ ऑक्टोबर, पहिली टी-२०: श्री माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियम, ग्वाल्हेर
९ ऑक्टोबर, दुसरी टी-२०: अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली
१२ ऑक्टोबर, तिसरी टी-२०: राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद
हेही वाचा – २७ वर्षांनी मुंबईचं इराणी करंडक जेतेपदाचं स्वप्न साकार; आठव्या क्रमांकावर खेळणाऱ्या तनुष कोटियनची शतकी खेळी
भारत विरुद्ध बांगलादेश टी-२० सामने किती वाजता सुरू होणार?
भारत विरुद्ध बांगलादेश टी-२० मालिकेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरु होणार आहेत, तर दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी अर्धा तास आधी मैदानात उतरतील.
बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव