IND vs BAN Virat Kohli hilarious dig At Shakib Al Hasan video viral : टीम इंडियाचा दिग्गज विराट कोहली बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजीत विशेष काही करू शकला नाही. पहिल्या डावात त्याने केवळ ६ धावा केल्या, तर दुसऱ्या डावात त्याला केवळ १७ धावा करता आल्या. अर्थात विराट कोहली फलंदाजीत काही विशेष करू शकला नाही, पण असे असूनही सोशल मीडियावर तो चर्चेत आहे. विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विराट कोहली बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनसोबत मजा करताना दिसत आहे.

विराट-शकीबचा व्हिडीओ व्हायरल –

विराट कोहली आऊट होण्यापूर्वी शुबमन गिलसोबत बॅटींग करत असताना नॉन स्ट्राइक एंडला त्याने शकीबसोबत मस्ती केली. चेन्नई कसोटीचा दुसरा दिवस संपण्यापूर्वी शकीब आणि मेहदी हसन मिराज बांगलादेशसाठी दोन्ही बाजूंनी फिरकीने सतत आक्रमण करत होते. विराट कोहलीला फिरकी गोलंदाजाने आऊट केले, पण यादरम्यान त्याला काहीतरी जाणवलं की, ज्यामुळे तो स्वतः रोखू शकला नाही आणि त्याने शकीब अल हसनला एक मजेशीर प्रश्न विचारला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
IND vs AUS Srikkanth Blasts at Mohammed Siraj for Travis Head Send off Said Don't You Have brains
IND vs AUS: “सिराज वेडा आहेस का तू?…”, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद सिराजवर संतापले, हेडच्या वादावर केलं मोठं वक्तव्य
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
Sunil Gavaskar Statement on India Defeat
IND vs AUS: “हॉटेलच्या रूममध्ये बसून…”, सुनील गावस्कर पराभवानंतर भारतीय संघावर संतापले, रागाच्या भरात नेमकं काय म्हणाले?
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?

विराटने शकीबला विचारला मजेशीर प्रश्न –

शकीब अल हसन चेन्नईच्या खेळपट्टीवर वारंवार फुल लेन्थ चेंडू टाकून भारतीय फलंदाजाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत होता. यानंतर जेव्हा शाकिब क्षेत्ररक्षण करत होता, तेव्हा विराटने त्याला विचारले की तू मली बनत आहेस का? पण शकीबला विराटचा प्रश्न समजला नाही. यानंतर विराट त्याला म्हणतो की, तू मलिंगा बनला आहेस, यॉर्करवर यॉर्कर टाकत आहेस. त्यानंतर दोघेही हसू लागतात. अशा प्रकारचे विराट कोहलीचे मजेशीर संभाषण स्टंप माईकमध्ये कैद झाले आहे. जे व्हायरल झाल्याने चाहत्यांनी प्रचंड आवडत आहे.

हेही वाचा – IND vs BAN : ‘चुकीच्या प्रकारातून निवृत्त झालास…’, चेन्नई कसोटीत अपयशी ठरल्यावर रोहित शर्मा होतोय ट्रोल

टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात कर्णधार रोहित शर्मानंतर यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहलीच्या रूपाने भारतीय संघाला दोन मोठे धक्के बसले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने ३०८ धावांची आघाडी मिळवली होती. याशिवाय भारतीय संघाची धावसंख्या २३ षटकानंतर ३ बाद ८० धावा आहे. आता शुबमन गिल ६४ चेंडूत ३३ धावांवर आणि ऋषभ पंत १३ चेंडूत १२ धावांवर नाबाद आहे.

Story img Loader