U19 World Cup 2024 India Vs Bangladesh Match Update : भारतीय संघ अंडर-१९ विश्वचषकातील पहिला सामना बांगलादेशविरुद्ध खेळत आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ७ गडी गमावून २५१ धावा केल्या. आदर्श सिंग आणि कर्णधार उदय सहारन यांनी संघासाठी शानदार खेळी केली. सलामीला आलेल्या आदर्शने ७६ धावा केल्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या कर्णधार सहारनने ६४ धावा केल्या. यादरम्यान बांगलादेशच्या मारूफ मृधाने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या.
मॅनगॉंग ओव्हल, ब्लोमफॉन्टेन येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. ३.६ षटकांत अर्शिन कुलकर्णीच्या रूपाने भारताने पहिली विकेट गमावली. यानंतर संघाला आठव्या षटकात दुसरा धक्का बसला. पण त्यानंतर कर्णधार उदय सहारन आणि आर्दश सिंग यांनी संघाला स्थैर्य मिळवून दिले आणि २५१ धावांपर्यंत मजल मारण्यास मदत केली.
आदर्श सिंग आणि कर्णधार उदय सहारन तिसऱ्या विकेटसाठी ११६ (१२४४ चेंडू) धावांची भागीदारी केली. ही मजबूत भागीदारी चौधरी मोहम्मद रिझवानने ३२व्या षटकात आदर्शच्या विकेटसह मोडली. आदर्शने ९६ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ७६ धावा केल्या. यानंतर संघाला कोणतीही मोठी भागीदारी करता आली नाही. उर्वरित खेळाडूंनी छोटे योगदान दिले. आदर्शनंतर कर्णधार सहारन ३९व्या षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला. ९४ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने ६४ धावा करणाऱ्या सहारनला विरोधी संघाचा कर्णधार महफुजुर रहमान रब्बीने बाद केले.
हेही वाचा – Sania-Shoaib Divorce : सानिया-शोएबच्या घटस्फोटाची पद्धत असलेला ‘खुला’ नेमका आहे काय? जाणून घ्या
बांगलादेशची अवस्था बिकट –
२५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची पहिली विकेट ३८ धावांवर पडली. झीशान आलम १७ चेंडूत १४ धावा करून बाद झाला. राज लिंबानीच्या चेंडूवर मुरुगन अभिषेकने अप्रतिम झेल घेतला. बांगलादेशची दुसरी विकेट ३९ धावांवर पडली. चौधरी मोहम्मद रिझवान खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. सौम्या पांडेने त्याला क्लीन बोल्ड केले. सौम्या पांडेने सलग दोन षटकांत विकेट घेत बांगलादेशला बॅकफूटवर आणले आहे. त्याने रिझवान पाठोपाठ सिबलीला क्लीन बोल्ड केले. सिबलीने ३५ चेंडूत १४ धावा केल्या.
हेही वाचा – Izhaan Custody : सानिया मिर्झा की शोएब मलिक, मुलगा इझहान कोणाबरोबर राहणार?
बांगलादेशने ५० धावांत गमावल्या चार विकेट्स –
अर्शिन कुलकर्णीने अहरार अमीनला बाद करुन बांगलादेशला चौथा झटका दिला. अहरारने १५ चेंडूत पाच धावा केल्या. अशा प्रकारे बांगलादेश संघाने १५ षटकांच्या समाप्तीनंतर चार ५० धावा केल्या आहेत. सध्या खेळपट्टीवर मोहम्मद शेहाब जेम्स आणि अरिफुल इस्लाम उपस्थित आहेत. जेम्सने अजून भोपळा फोडला नसून इस्लाम ४ धावांवर खेळत आहेत. भारताकडून सौम्या पांडेने दोन आणि लिंबानी-कुलकर्णी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.