IND vs BAN Match Updates Sara Tendulkar Video Viral: एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेश संघाची सुरुवात चांगली झाली होती, मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केले. या सामन्यात बांगालेदशने नाणेफेक जिंकून प्रथम फललंदाजी करताना ५० षटकांत ८ गडी गमावून २५६ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर टीम इंडियासमोर २५७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान या सामन्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सारा तेंडुलकर दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली आहे. तसेच, सारा मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. त्यानंतर चाहत्यांनी पुन्हा एकदा सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांच्याबद्दल चर्चा सुरु केली आहे.

उल्लेखनीय म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज शुबमन गिलचे नाव सारा तेंडुलकरसोबत वारंवार जोडले जात आहे. अद्याप दोघांनीही गिल त्यांच्या नात्याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. पण जेव्हाही सारा तेंडुलकर कुठेतरी दिसली की क्रिकेट चाहत्यांनी शुबमन गिलच्या नावाची आठवण येते.

हेही वाचा – Israel and Hamas War: मोहम्मद रिझवाननंतर ‘हे’ पाकिस्तानी क्रिकेटपटू उतरले पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ, झेंडा शेअर दर्शवला पाठिंबा

बांगलादेशने भारतासमोर २५७ धावांचे ठेवले लक्ष्य –

सामन्याबद्दल बोलायचे, तर प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ८ गडी गमावून २५६ धावा केल्या. वनडे वर्ल्ड कप २०२३ मध्ये सलग चौथा विजय मिळवण्यासाठी टीम इंडियासमोर २५७ धावांचे लक्ष्य आहे. बांगलादेशकडून लिटन दासने सर्वाधिक ६६ धावा केल्या. तसेच तनजीद हसनने ५१ धावांची खेळी केली. अखेरीस महमुदुल्लाहने ४६ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या २५० धावांच्या जवळ नेली. त्यानंतर मुशफिकुर रहीमने ३८ धावांचे योगदान दिले. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन बळी घेतले. शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban match updates sara tendulkar attends india vs bangladesh match video viral vbm