IND vs BAN Match Updates World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या १७ व्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा सात गडी राखून पराभव केला आहे. भारताचा या स्पर्धेतील हा सलग चौथा विजय असून टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना आठ गडी गमावून २५६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर ३ गडी गमावून हे लक्ष्य गाठले. विराट कोहलीला शानदार खेळीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

आता भारताचे ४ सामन्यांत ८ गुण झाले आहेत. मात्र, भारतीय संघ अजूनही गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. पॉइंट टेबलमध्ये न्यूझीलंड अव्वल स्थानावर कायम आहे. न्यूझीलंडचेही ४ सामन्यात ८गुण आहेत, मात्र टीम इंडियापेक्षा चांगल्या नेट रनरेटमुळे किवी संघ अव्वल स्थानावर आहे.

Bangladesh Captain Big Statement Ahead of IND vs BAN test Series
IND vs BAN: “ते क्रमवारीत पुढे असले तरी…”, कसोटी मालिकेआधी बांगलादेशच्या कर्णधाराचं भारतीय संघाला आव्हान, नेमकं काय म्हणाला?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
IND vs PAK Hockey India beat Pakistan by 2 1 in Asian Champions Trophy and Enters SemiFinal
IND vs PAK Hockey: भारतीय हॉकी संघाचा पाकिस्तानवर विजय अन् सेमीफायनलमध्ये मारली धडक, कर्णधार हरमनप्रीत सिंहचे दोन दणदणीत गोल
Bangladesh beat Pakistan by 6 wickets
WTC Points Table : पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयानंतर बांगलादेशची मोठी झेप, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेलाही टाकलं मागे
PAK vs BAN Mohammed Rizwan Broke Rishabh Pant and Andy Flower Record
PAK vs BAN: मोहम्मद रिझवानने मोडला ऋषभ पंतचा विक्रम, पराभूत कसोटी सामन्यात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला पाकिस्तानी यष्टिरक्षक
Kamran Akmal on PAK vs BAN Test
PAK vs BAN : ‘जागतिक स्तरावर पाकिस्तान क्रिकेट चेष्टेचा विषय…’, कामरान अकमलची सडकून टीका; म्हणाला, क्लब क्रिकेटर्स पण…
Pakistani team cricketers trolls on social media
PAK vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा संघ तुफान ट्रोल, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Pakistan drop in the World Test Championship table after defeat against Bangladesh
PAK vs BAN : पाकिस्तानची बांगलादेशविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर क्रिकेट विश्वात फजिती! डब्ल्यूटीसी गुणतालिकेतही घसरण

विराट कोहलीने झळकावले शानदार शतक –

भारतीय गोलंदाजांनंतर फलंदाजांनी आपली ताकद दाखवून दिली. टीम इंडियासमोर २५७ धावांचे लक्ष्य होते. भारताने ४१.३ षटकांत ३ बाद २६१ धावा करत सामना जिंकला. भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा ४० चेंडूत ४८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. शुबमन गिलने पन्नास धावांचा टप्पा पार केला. शुबमन गिल ५५ चेंडूत ५३ धावा करून बाद झाला.

यानंतर विराट कोहलीने उर्वरित काम पूर्ण केले. विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. भारताचा माजी कर्णधार ९७ चेंडूत १०३ धावा करून नाबाद परतला. श्रेयस अय्यर अवघ्या १९ धावा करून बाद झाला. याशिवाय केएल राहुल ३४ चेंडूत ३४ धावा करून नाबाद राहिला. बांगलादेशकडून मेहंदी हसन मिराज हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. मेहंदी हसन मिराजने २ विकेट्स घेतल्या. या खेळाडूने शुबमन गिल आणि श्रेयस अय्यरला बाद केले. याशिवाय हसन महमूदला एक विकेट मिळाली. हसन महमूदने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला बाद केले.

तत्पूर्वी तन्जिद हसन (५१), लिटन दासची (६६) अर्धशतकं आणि अखेच्या षटकांमध्ये महमदुल्लाहने (४६) केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर बांगलादेशने निर्धारित ५० षटकांमध्ये ८ बाद २५६ धावांपर्यंत मजल मारली होती. या सामन्यात भारताकडून जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादवने १-१ विकेट घेतली.