Virat Kohli apologizes to Ravindra Jadeja: बांगलादेशविरुद्धच्या विश्वचषक २०२३च्या सामन्यात विराट कोहलीने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील ४८ वे शतक झळकावले. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने विश्वचषकात धावांचा पाठलाग करताना प्रथमच १०० धावांचा टप्पा पार केला. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर बांगलादेशने २५७ धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना कोहलीने ९७ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १०३ धावांची नाबाद खेळी केली. किंग कोहलीच्या या खेळीच्या जोरावर भारताने हा सामना ७ गडी राखून जिंकला. यानंतर विराट कोहलीने विजयावर आपली प्रतिक्रिया दिली.

विराटने मागितली रवींद्र जडेजाची माफी –

या मॅचविनिंग शतकासाठी कोहलीला सामनावीर पुरस्कार मिळाला. विराट जेव्हा त्याचा पुरस्कार घेण्यासाठी आला, तेव्हा त्याने सर्वप्रथम रवींद्र जडेजाची माफी मागितली. पुरस्कार सोहळ्यादरम्यान कोहली म्हणाला, “जड्डूकडून सामनावीर पुरस्कार चोरल्याबद्दल मी माफी मागतो.” आपल्या शतकाबाबत कोहली म्हणाला, “मला मोठे योगदान द्यायचे होते. कारण विश्वचषकात मी काही अर्धशतके झळकावली आहेत, पण मी त्यांचे रूपांतर शतकांमध्ये करू शकलो नाही. मला यावेळी सामना संपवायचा होता आणि शेवटपर्यंत टिकायचे होते, जे मी वर्षानुवर्षे केले आहे.”

IND vs ENG 1st Test Match Updates in Marathi
IND vs NZ : बंगळुरु कसोटीत न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा कहर! ५५ वर्षांनंतर भारताच्या पदरी नामुष्की
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
New Zealand vs India first test match predict rain sport news
भारताचेच पारडे जड; न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यावर पावसाचे सावट
IND vs BAN 3rd T20I Sanju Samson credited captain Suryakumar Yadav and coach Gautam Gambhir
IND vs BAN : ‘मी खूप वेळा अपयशी ठरलो आहे पण…’, शतकी खेळीनंतर संजू सॅमसनच्या प्रतिक्रियेने टीम इंडियासह चाहत्यांची जिंकली मनं
PAK vs ENG Chris Woakes on Pakistan Team
PAK vs ENG : इंग्लंडच्या गोलंदाजाने विजयानंतर पाकिस्तानची उडवली खिल्ली; म्हणाला, ‘आता खेळपट्टीत बदल केले जातील…’
India vs Bangladesh 1st T20 Match highlights
IND vs BAN : सूर्याच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने फडकावली विजयी पताका, बांगलादेशचा ७ विकेट्सनी उडवला धुव्वा
batsman jemima rodrigues on t20 world cup
जेतेपदाच्या स्वप्नपूर्तीसाठी परिस्थितीनुसार खेळणे आवश्यक! ट्वेन्टी२० विश्वचषकाबाबत जेमिमाचे मत
Cameron Green Doubtful For Border-Gavaskar Trophy After Sustaining Back Injury In England ODIs
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, ‘या’ स्टार अष्टपैलू खेळाडूला झाली दुखापत

अर्धशतकी खेळी करणारा कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्यानंतर १३व्या षटकात कोहली क्रिजवर आला, तेव्हा हसन महमूदने सलग दोन नो बॉल टाकत विराटला शानदार सुरुवात करण्याची संधी दिली. यावर तो म्हणाला, “मी शुबमनला सांगत होतो की, अशी परिस्थिती स्वप्नात पाहिली तरी प्रत्यक्षात होईल असे वाटणार नाही. पहिले चार चेंडू, दोन फ्री-हिट, एक षटकार आणि एक चौकार ही माझ्यासाठी स्वप्नवत सुरुवात होती.”

हेही वाचा – IND vs BAN: ‘चेज मास्टर’ विराट कोहलीने झळकावले ४८वे शतक, भारताचा बांगलादेशवर ७ गडी राखून दणदणीत विजय

खेळपट्टीबाबत बोलताना विराट कोहली म्हणाला, “खेळपट्टी खूप चांगली होती आणि मला फक्त माझा खेळ खेळण्याची गरज होती. त्यामुळे फक्त चेंडूला टायम करणे, गॅपमध्ये मारणे, जोरात धावणे आणि गरज असेल तेव्हा चौकार मारणे, यावर माझे लक्ष होते.” बांगलादेशचा पराभव करून भारताने २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत सलग चौथा विजय मिळवला. संघाची गती चांगली आहे आणि खेळाडूंमध्येही सकारात्मक वातावरण असल्याचे कोहलीने मान्य केले.

आम्ही एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेत आहोत –

विराट कोहली पुढे म्हणाला, “चेंजिंग रूममध्ये खूप चांगले वातावरण आहे. आम्ही एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेत आहोत. प्रत्येकजण तिथल्या भावना पाहू शकतो. आम्ही समजू शकतो की ही एक मोठी स्पर्धा आहे. तसेच आम्हाला थोडी गती वाढवण्याची गरज आहे. मायदेशात आणि या सर्व लोकांसमोर खेळणे ही एक खास भावना आहे.”