IND vs BAN ODI: भारत व बांगलादेशच्या एकदिवसाय सामन्यांच्या मालिकेत रविवारी ४ डिसेंबरला ढाका येथे पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत केवळ १८६ धावा केल्या होत्या. भारताच्या युवा गोलंदाजांनी बांगलादेशचे नऊ बळी मिळेपर्यंत दमदार गोलंदाजी केली होती. शेवटच्या एका विकेटसाठी मात्र टीम इंडियाला प्रचंड मेहनत करूनही यश मिळवता आले नाही. परिणामी, मेहदी हसन मिराजने बांगलादेशला एक विकेट राखून विजय मिळवून दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीम इंडियाच्या बांगलादेश संघात प्लेइंग ११ मध्ये के. एल. राहुलचे स्थान अगदी आयत्या वेळी निश्चित झाले होते. रिषभ पंत संघातून बाहेर पडल्याने त्याच्या जागी २८ वर्षीय के.एल राहुल याला संघात संधी देण्यात आली. यावेळी रिषभ पंतच्या अनुपस्थितीबाबत राहुलला प्रश्न करताच त्याने अगदी रोखठोक उत्तर दिले आहे.

सुरुवातीला मधल्या फळीत फलंदाजी करण्यावरून राहुल म्हणाला की, “मी याआधी ४ व ५ व्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे, मला जे टीमकडून सांगितलं त्यास्तही मी तयार असतो.” पुढे ऋषभ पंतवरूनही राहुलने स्पष्टच उत्तर दिले. तो म्हणाला की, “ऋषभ खेळत नाही हे मला ड्रेसिंग रूममध्ये समजलं. मला काहीच माहीत नव्हतं मी इतरांना काय झालं विचारल्यावर त्याला काढून टाकल्याचं कळलं. कदाचित यामागे वैद्यकीय कारण असेल

पंतबद्दल पुढे राहुल म्हणाला की बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकल्यानंतर संघातील सदस्यांना ड्रेसिंग रूममध्ये विकेटकीपर नसल्याची माहिती मिळाली. BCCI कडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार पंतला योग्य स्पष्टीकरण किंवा एकही कारण न देता टीममधून काढण्यात आले आहे. पंतसोबत काय झाले याची खेळाडूंनाही फारशी कल्पना नाही. सध्या आम्ही यात लक्ष घालत नाही आहोत कारण सध्या खेळात लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

हे ही वाचा<< Video: तू गल्ली क्रिकेट…; ऋषभ पंतने हर्षा भोगलेंना दिलेलं ‘ते’ उत्तर ऐकून नेटकरी भडकले, पाहा ट्वीट्स

बांगलादेश विरुद्ध सामन्यात भारताच्या फलंदाजीची धुरा कर्णधार केएल राहूलने सांभाळली होती. के. एल राहुलने ७० चेंडूत ७३ धावा केल्या होत्या. पण एकाअर्थी टीमच्या पराभवातही के. एल. राहुलच महत्त्वाचे कारण ठरला. विजयासाठी ३२ धावांची आवश्यकता असताना मेहदी हसन मिराजचा झेल के. एक राहूलने डीप मिडविकेटला सोडला. लॉंगऑनला असलेला रजत पाटीदार झेल पकडायला आला होता मात्र राहुलने “मी हा झेल पकडतो” असा इशारा केला पण ऐनवेळी राहुलकडून झेल सुटला व टीम इंडियाने सामना गमावला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban odi k l rahul big remark on rishabh pant says we were in dressing room and bcci removed pant svs