India vs Bangladesh, World Cup 2023: शानदार फॉर्मात असलेल्या भारतीय संघाने गुरुवारी या विश्वचषकात सलग चौथा विजय संपादन केला. त्यांनी बांगलादेशचा सात गडी राखून पराभव केला. मात्र, या सामन्यात विजयापेक्षा विराट कोहलीच्या शतकाची आणि पंच रिचर्ड कॅटलबरा यांचीच अधिक चर्चा झाली. विराट कोहलीचे हे वन डेतील ४८वे शतक ठरले. कोहलीच्या या नव्या विक्रमाचा क्रिकेटविश्व जल्लोष करत असतानाच सोशल मीडियावर काही लोकांनी कोहलीच्या संथ खेळीवर निशाणा साधला आहे. केवळ कोहलीला शतक झळकावण्यासाठी इतकी षटके खेळणे ही भारताची खेळी योग्य आहे का, अशी चर्चा सुरू आहे.
सामन्यात नेमकं काय झालं?
वास्तविक, टीम इंडिया हा सामना काही षटकांपूर्वीच जिंकू शकला असता, परंतु नॉन-स्ट्रायकर एंडला उपस्थित असलेल्या के.एल. राहुलने कोहलीच्या शतकासाठी एकही मोठा शॉट खेळला नाही किंवा त्याने स्ट्राइक रोटेट करून एकही धाव घेतली नाही. कोहलीही काही प्रसंगी स्ट्राइक रोटेट करताना दिसला नाही. राहुलनेही कोहलीला स्ट्राइक मिळवण्यासाठी एकेरी धाव नाकारली. काही लोक म्हणतात की, यामुळे भारताचा नेट रन रेटही घसरला, जो टीम इंडिया सुधारू शकला असता. भविष्यात जर भारत नेट रन रेटच्या समस्येत अडकला तर त्याचे मोठे भोगावे लागेल.
पुजारा कोहलीच्या शतकावर नाराज
भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराही या वृत्तीवर खूश नाही. कोहलीच्या या शतकावर त्याने नाराजीही व्यक्त केली आहे. एका क्रिकेट वेबसाईटशी बोलताना पुजारा म्हणाला, “विराट कोहलीने शतक झळकावे अशी माझी पण इच्छा होती, पण तुम्हाला हा सामना लवकरात लवकर संपवायचा होता हे लक्षात ठेवायला हवे होते. तुमचा नेट रनरेट वाढवण्याचा हीच एक संधी होती. तुम्ही गुणतालिकेत सर्वात वरच्या क्रमांकवर असावे असे मला वाटते. जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीत असाल जिथे तुम्हाला नेट रनरेटची गरज आहे, तेव्हा तिथे तुम्ही मागे वळून विचार करू इच्छित नाही की त्या सामन्यात आम्ही हे करू शकलो असतो. मग तुम्ही पश्चातापाशिवाय काहीचं काहीच करू शकत नाही.”
पुजारा काय म्हणाला?
कोहली आणि इतर भारतीय खेळाडूंनी संघाला प्राधान्य दिले पाहिजे, असे पुजाराचे मत आहे. जोपर्यंत वैयक्तिक कामगिरीचा संबंध आहे, पुजाराचा असा विश्वास आहे की खेळाडूची मानसिकता देखील महत्त्वाची आहे. तो म्हणाला, “मला वाटते एक संघ म्हणून तुम्हाला कदाचित थोडा त्याग करावा लागेल. तुम्हाला संघाची प्राथमिकता समजून घ्यायची आहे, तुम्हाला संघ प्रथम ठेवायचा आहे, मी त्याकडे कसे पाहतो. तुम्हाला तुमचे स्वतःचे कर्तृत्व हवे आहे, परंतु संघाच्या संघाला आधी प्राधान्य द्या. एक खेळाडू म्हणून तुमच्याकडे नेहमीच निवड असते, परंतु काही खेळाडूंना असे वाटते की, जर त्यांनी शतक झळकावले तर ते त्यांना पुढील सामन्यात मदत फॉर्मसाठी मदत करेल. त्यामुळे तुमची मानसिकता कोणत्या प्रकारची आहे यावर ते अवलंबून आहे.”
मॅथ्यू हेडन काय म्हणाला?
ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज मॅथ्यू हेडन यानेही या विषयावर आपले मत मांडले आणि खेळाडूंनी अशी मानसिकता स्वीकारण्यास सुरुवात केली तर भविष्यात त्यांचा फॉर्म त्यांना त्रास देऊ शकतो, असे तो म्हणाला. हेडन म्हणाला, “माझी सुरुवातीची प्रतिक्रिया होती की त्याने शतक पूर्ण करण्याचा हक्क मिळवला आहे. मात्र, या स्पर्धांमध्ये तुम्हाला खूप सावध राहावे लागेल. नेट रनरेट आणि जास्त कालावधीत कमी षटके हे दोन घटक खूप महत्त्वाचे आहेत. महान इयान बिशप याबद्दल अनेकदा बोलतो. त्याचे परिणाम भविष्यात भयानक होऊ शकतात. तुम्ही जर असेच खेळत असाल तर तुमचा चांगला फॉर्म तुमचाच घात करू शकतो. मात्र, तो निर्णय दोघांनी (विराट आणि राहुल) घेतला होता. मला त्यात खरोखर काही अडचण वाटली नाही.”