India vs Bangladesh 2nd Test Scorecard in Marathi: भारत आणि बांगलादेश यांच्यातील कानपूर कसोटीच्या पाचव्या दिवशी खेळ सुरू आहे. सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताचा स्टार फिरकी गोलंदाज आर अश्विनने आपल्या संघाला पहिले यश मिळवून दिले, तिथे त्याने बांगलादेशचा फलंदाज मोमिनुल हकला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पहिल्या डावातील शतकवीर मोमिनुलला केएल राहुलने झेलबाद केले, त्यामुळे त्याचा डाव अवघ्या दोन धावांवर आटोपला. लेग-स्लिपमध्ये राहुलने शानदार झेल घेतला. त्याच्या झेलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पण या विकेटसाठी रोहित आणि अश्विनने कमाल फिल्ड सेट केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित-अश्विनने मोमिनुलसाठी रचला सापळा

रविचंद्रन अश्विनने पाचव्या दिवसाच्या तिसऱ्या षटकात मोमिनुलची विकेट घेतली. बांगलादेशसाठी मोमिनुलने पहिल्या डावात शतक झळकावले होते. मोमिनुलच्या शतकाच्या जोरावर बांगलादेशने पहिल्या डावात २३३ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना त्याने अश्विनने टाकलेल्या लेगस्टंपच्या बाहेरचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटला नीट लागला नाही आणि कडेला आदळल्यानंतर तो लेग स्लिपमध्ये उभ्या असलेल्या केएल राहुलच्या हातात गेला. मोमिनुलला ८ चेंडूत केवळ २ धावा करता आल्या.

हेही वाचा – “रोहितचा मेसेज स्पष्ट होता, आऊट झालो तरी हरकत नाही…”, फलंदाजीपूर्वी संघाला कर्णधाराने नेमकं काय सांगितलं? राहुलने केला खुलासा

मोमिनुल हकला बाद करण्यासाठी रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विनने फिल्ड सेट केली होती आणि मोमिनुल या दोघांच्या जाळ्यात अडकला. डावखुरा फलंदाज जेव्हा कसोटीत ऑफ-स्पिनरविरुद्ध खेळत असतो, तेव्हा लेग-स्पिनरच्या इथे क्षेत्ररक्षक नसतो. कारण चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जातो. पण कर्णधार रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विनने मोमिनुलसाठी सापळा रचला होता.

हेही वाचा – IND vs BAN: रोहित शर्माचे पहिल्याच २ चेंडूंवर २ दणदणीत षटकार, १४७ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली असं काही

स्वीप शॉट मारणे ही मोमिनुलची ताकद आहे. सुरुवातीला दोन क्षेत्ररक्षकमध्ये स्लिपमध्ये ठेवले होते. षटकाचा दुसरा चेंडू मोमिनुलने स्विप करताच कर्णधाराने दुसऱ्या स्लिपवरील क्षेत्ररक्षक लेग स्लिपमध्ये उभा केला. पुढच्या चेंडूवर पुन्हा मोमिनुल स्वीप मारायला गेला अन् केएल राहुलने झेल टिपत त्याला बाद केले.

हेही वाचा – IND vs BAN: ऋषभमुळे विराट रनआऊट होता होता वाचला; कोहलीचा रुद्रावतार पाहून पंत जवळ गेला अन्… VIDEO व्हायरल

मोमिनुल हकने पहिल्या डावात स्वीपसह अनेक धावा केल्या होत्या. तेव्हा पहिल्या डावात भारतीय संघाने एकाही क्षेत्ररक्षकाला लेग स्लिपमध्ये ठेवले नव्हते. मात्र दुसऱ्या डावात कर्णधार रोहितने आपली रणनिती बदलली. भारताच्या खेळाडूंनी तिन्ही प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये भारताने चांगली कामगिरी करत या कसोटी सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे. दुसऱ्या डावात बांगलादेशचा संघ ऑल आऊट होण्याच्या मार्गावर आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban ravichandran ashwin and rohit sharma set fielding to dismiss mominul haque kl rahul take perfect catch watch video bdg