IND vs BAN Ashwin became first bowler take 50 Wickets in 3 WTC Season : भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या आतापर्यंतच्या तिन्ही हंगामात वर्चस्व गाजवले आहे. कानपूरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्याच्या चौथ्या दिवशी अश्विनने आणखी एक मोठा पराक्रम केला. बांगलादेश संघाच्या पहिल्या डावात जेव्हा त्याने शकीब अल हसनला बाद केले, तेव्हा आणखी एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या तिन्ही हंगामातील अश्विनची आतापर्यंतची कामगिरी –

अश्विन जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासातील पहिला गोलंदाज ठरला, ज्याने तिन्ही हंगामात ५० किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. या हंगामात अश्विनने आतापर्यंत ५२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पहिल्या हंगामापासून तिसऱ्या चक्रापर्यंत गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अश्विनने २०१९ ते २०२१ या कालावधीत खेळल्या गेलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पहिल्या हंगाामात १४ सामने खेळले आणि ७१ विकेट्स घेण्यात यश मिळवले.

Rohit Sharma Becomes First Opener to Hit Sixes on First Two Balls of Test Innings IND vs BAN
IND vs BAN: रोहित शर्माचे पहिल्याच २ चेंडूंवर २ दणदणीत षटकार, १४७ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली असं काही
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
IND vs BAN India breaks England record for fastest team fifty
IND vs BAN : भारताने इंग्लंडचा रेकॉर्ड मोडत केला विश्वविक्रम! कसोटी क्रिकेटमध्ये नोंदवला खास पराक्रम
Rohit Sharma Became First Captain to Complete 1000 Runs in 2024 IND vs BAN 1st Test
IND vs BAN: रोहित शर्माने चेन्नई कसोटीत केला मोठा पराक्रम; २०२४ मध्ये ही कामगिरी करणारा ठरला पहिला कर्णधार
IND vs BAN 1st Test Ravichandran Ashwin 6th century
IND vs BAN : रविचंद्रन अश्विनचे ऐतिहासिक शतक! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू
IND vs BAN Yashasvi Jaiswal broke George Headley's record
IND vs BAN : यशस्वी जैस्वालचा मोठा पराक्रम! जॉर्ज हेडलीचा ८९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत लिहिला इतिहास
Duleep Trophy 2024 Akashdeep Statement on Mohammed Shami Gives Credit to His Advice After Taking 9 Wickets Haul
Duleep Trophy 2024: आकाशदीपला मोहम्मद शमीने दिला होता गुरूमंत्र, दुलीप ट्रॉफीतील सामन्यात ९ विकेट्स घेतल्यानंतर केला खुलासा
Duleep Trophy 2024 Dhruv Jurel equaled MS Dhonis record
Duleep Trophy 2024 : विक्रमांचा ‘ध्रुव’तारा; जुरेलने केली महेंद्रसिंग धोनीच्या २० वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी

यानंतर २०२१ ते २०२३ या कालावधीत खेळल्या गेलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या हंगामात अश्विनने १३ सामने खेळताना एकूण ६१ विकेट्स घेतल्या. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या हंगामात आतापर्यंत अश्विनने १० सामने खेळून ५२ विकेट घेतल्या आहेत, ज्यात आणखी वाढ होण्याची खात्री आहे. याशिवाय अश्विनने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिन्ही हंगामात एकूण १८४ विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये त्याला नॅथन लॉयनच्या पुढे जाण्याची मोठी संधी आहे, ज्यासाठी अश्विनला आणखी फक्त ४ विकेट्स घ्यायच्या आहेत.

हेही वाचा – IND vs BAN : आकाश दीपने विराटच्या बॅटने ठोकले २ गगनचुंबी षटकार, कोहली-रोहितसह गंभीरही चकित, पाहा VIDEO

अश्विन उजव्या आणि डाव्या हाताच्या दोन्ही फलंदाजांविरुद्ध प्रभावी –

आतापर्यंत अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण १०२ सामने खेळताना ५२६ विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये त्याने १९१ डावांमध्ये २६३ वेळा उजव्या हाताच्या फलंदाजांना बाद केले आहे. तसेच त्याने डाव्या हाताच्या फलंदाजांनही २६३ वेळा बाद केले आहे. अश्विनची आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये उजव्या हाताच्या फलंदाजांविरुद्ध १९.३ ची सरासरी राहिला आहे, तर त्याने डाव्या हाताच्या फलंदाजांविरुद्ध २७.९ च्या सरासरीने विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात डावखुऱ्या खेळाडूंना बाद करण्यात अश्विन आघाडीवर आहे.