IND vs BAN 1st Test Ravichandran Ashwin Broke Anil Kumble Record : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय संघाने आपली पकड मजबूत केली आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात रविचंद्रन अश्विनने पूर्णपणे अप्रतिम कामगिरी केली, ज्यामध्ये त्याने पहिल्या डावात उत्कृष्ट शतक झळकावून टीम इंडियाला संकटातून बाहेर काढले. आता त्याने आपल्या फिरकीची कमाल दाखवत ३ विकेट्स घेत अनिल कुंबळेचा मोठा विक्रम मोडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोन सामन्याच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा बांगलादेश संघाने ५१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ४ विकेट गमावल्या होत्या, त्यापैकी रविचंद्रन अश्विनने ३ विकेट्स घेतल्या होत्या. यासह अश्विन अण्णाने महान भारतीय गोलंदाज अनिल कुंबळेचा कसोटी क्रिकेटमधील मोठा विक्रम मोडला आणि त्याच्या पुढे गेला आहे. विशेष म्हणजे, अश्विनने पहिल्या डावात बॅटने धुमाकूळ घालत शतक झळकावले होते, आता त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधलं आहे.

अश्विन भारताकडून कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला –

अश्विनने या सामन्यात कसोटी क्रिकेटमधील सहावे शतक झळकावले, तर आता त्याने चेंडूसह मोठा पराक्रम केला आहे. त्याने भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या डावात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होण्याचा मान मिळवला आहे. या बाबतीत अश्विनने अनिल कुंबळेला मागे टाकले आहे, ज्याने कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात एकूण ९४ विकेट्स घेतल्या होत्या, आता अश्विनच्या नावावर ९६ विकेट्सची नोंद झाली आहे.

हेही वाचा – IND vs BAN : बुमराहच्या गोलंदाजीवर यशस्वीने झाकीरचा ‘डायव्हिंग’ करत घेतला उत्कृष्ट झेल, VIDEO व्हायरल

भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या डावात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –

रविचंद्रन अश्विन – ९६ विकेट्स
अनिल कुंबळे – ९४ विकेट्स
बिशनसिंग बेदी – ६० विकेट्स
इशांत शर्मा – ५४ विकेट्स
रवींद्र जडेजा – ५१ विकेट्स

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban ravichandran ashwin broke anil kumble record most wicket for india in 4th inning test match vbm