IND vs BAN 1st Test Ravichandran Ashwin registers many records : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना चेपॉक, चेन्नई येथे खेळला गेला. हा सामना २८० धावांनी जिंकून भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात रविचंद्रन अश्विनने बॅट आणि बॉल दोन्हीने अप्रतिम कामगिरी केली. अश्विनने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात शानदार शतक झळकावले, नंतर गोलंदाजी करताना बांगलादेशच्या सहा फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. या कामगिरीसह अश्विन अण्णाने चेन्नई कसोटीत विक्रमांची रांग लावली आहे.

५ विकेट्स घेणारा सर्वात वयस्कर भारतीय गोलंदाज –

चेन्नई कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात आर अश्विनने ६ विकेट्स घेतल्या. आता अश्विन कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेणारा सर्वात वयस्कर भारतीय खेळाडू ठरला आहे. अश्विनने तिसऱ्या दिवशी ४ विकेट्स घेतल्या होत्या. यानंतर चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात अश्विनने दोन विकेट्स घेतल्या. चौथ्या दिवशी कर्णधार रोहित शर्माने अश्विनकडे चेंडू उशिरा दिल्याचे दिसून आले. पण अश्विनने येताच आपली छाप सोडली.

Harshit Rana concussion substitue replaces shivam dube
Harshit Rana Concussion : फलंदाजाच्या जागी गोलंदाज कसा येऊ शकतो? भारताच्या विजयानंतर कनक्शन सबस्टिट्यूटवरुन पेटला वाद
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
IND vs ENG Gautam Gambhir played a master stroke as Harshit Rana to beat England Pune T20I match
IND vs ENG : गौतम गंभीरच्या मास्टर स्ट्रोकमुळे भारताने मारली बाजी! ‘हा’ निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट
Harshit Rana makes T20I debut as concussion substitute against England
IND vs ENG: हर्षित राणाचं चौथ्या टी-२० सामन्यादरम्यान अनोखं पदार्पण, पहिल्याच षटकात घेतली विकेट; नेमकं काय घडलं?
Hardik Pandya Shivam Dube Partnership Record with Fifty for 6th Wicket IND vs ENG 4th T20I
IND vs ENG: हार्दिकचा नो-लूक षटकार तर शिवम दुबेचं दणक्यात पुनरागमन; दुबे-पंड्याने अर्धशतकांसह भारतासाठी रचली विक्रमी भागीदारी
Hardik Pandya Throws Bat Curses Himself After His Wicket in IND vs ENG 3rd T20I Video Viral
IND vs ENG: हार्दिक पंड्याने आऊट झाल्यावर मैदानातच काढला राग, बॅट फेकली अन्… VIDEO व्हायरल
Hardik Pandya surpasses Bhuvneshwar Kumar to become Most balls bowled for India in T20I cricket
IND vs ENG : हार्दिक पंड्याची ऐतिहासिक कामगिरी! भुवनेश्वर कुमारला मागे टाकत केला मोठा पराक्रम
Tilak Verma and Suryakumar Yadav victory celebration video goes viral after India won Chepauk
Tilak Verma : तिलकच्या वादळी खेळीने जिंकलं सूर्याचं मन, वाकून सलाम करतानाचा VIDEO होतोय व्हायरल

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७५० विकेट्स पूर्ण –

चेन्नई कसोटी सामन्यात अश्विनला पहिल्या डावात एकही विकेट मिळाली नाही. मात्र दुसऱ्या डावात अश्विनने झटपट विकेट्स घेतल्या. अश्विनने दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेत कसोटी क्रिकेटमधील ५२२ विकेट्स पूर्ण केल्या. आता अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७५० विकेट्स पूर्ण झाल्या आहेत. ज्यामध्ये अश्विनने वनडेमध्ये १५६ आणि टी-२० मध्ये ७२ विकेट्स घेतल्या आहेत. अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

हेही वाचा – IND vs BAN : ‘…म्हणून बांगलादेशी फिरकीपटूंविरुद्ध मुक्तपणे फटकेबाजी करु शकलो’, शुबमन गिलने सांगितले कारण

भारताकडून सर्वाधिक वेळा ५ विकेट्स घेणारा गोलंदाज –

आर अश्विन भारताकडून वेळा ५ विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. अश्विनने आतापर्यंत भारतासाठी ३७ वेळा ५ किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय अश्विन सर्वात जलद २५०, ३०० आणि ३५० विकेट्स घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे.

हेही वाचा – IND vs BAN : शकीब अल हसन फलंदाजी करताना काळा धागा का चघळतो? दिनेश कार्तिकने सांगितले कारण

ही कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू –

रविचंद्रन अश्विन आता कसोटीत ५०० पेक्षा जास्त विकेट्स घेणारा, १४ वेळा पन्नास पेक्षा जास्त धावा करणारा, ३७ वेळा पाचपेक्षा जास्त विकेट्स घेणारा, त्याचबरोबर २० वेळा पन्नासपेक्षा जास्ता धावा करणारा, तसेच कसोटीत सहा शतके झळकावणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. या बाबतीत अश्विननंतर इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने कसोटीत ६०४ विकेट्ससह १४ वेळा पन्नास पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

Story img Loader