Rishabh Pant 2nd Indian wicketkeeper to complete 4000 international cricket : चेन्नईमध्ये ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत नवा विक्रम केला आहे. २०२२ मध्ये एका भीषण रस्ता अपघातात दुखापत झाल्यानंतर पंत बराच काळ मैदानापासून दूर राहिला होता. मात्र, बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून त्याने भारतीय कसोटी संघात पुनरामगन केले आहे. ऋषभ पंत ६३४ दिवसांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये परतला आहे. त्याने आपला शेवटचा कसोटी सामना २५ डिसेंबर २०२२ रोजी मीरपूर येथे बांगलादेशविरुद्ध खेळला होता. ऋषभ पंत पुनरागमन करत एमएस धोनीच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संघाला पहिला धक्का रोहित शर्माच्या रुपाने बसला, जेव्हा संघाची धावसंख्या केवळ १४ धावा होती. कर्णधार केवळ ६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शुबमन गिलला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर विराट कोहली काहीतरी अप्रतिम करेल अशी अपेक्षा होती, पण तोही अपयशी ठरला. सहा चेंडूत सहा धावा करून तो बाद झाला. या तिघांना वेगवान गोलंदाज हसन महमूदने बाद केले. यानंतर ऋषभ पंत आणि यशस्वी जैस्वालने संघाचा डाव सावरला. या दरम्यान ऋषभ पंतने १९ धावा पूर्ण करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा विक्रम केला.

ऋषभ पंतच्या यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ४००० धावा पूर्ण –

वास्तविक, चेन्नई कसोटीत १९वी धाव घेताच ऋषभ पंतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या ४००० धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसरा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी केवळ महेंद्रसिंग धोनीलाच ही कामगिरी करता आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून धोनीच्या नावावर १७०९२ धावा आहेत. धोनीनंतर आता पंतने ४००० किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.

हेही वाचा – IND vs BAN 1st Test : यशस्वी जैस्वालने बेन डकेटला मागे टाकत केला खास पराक्रम, WTC 2025 मध्ये पटकावले दुसरे स्थान

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय यष्टीरक्षक –

महेंद्रसिंग धोनी- १७०९२
ऋषभ पंत- ४००३
सय्यद किरमाणी- ३१३२
फारुख इंजिनियर- २७२५
नयन मोंगिया- २७१४
राहुल द्रविड- २३००