Rohit Sharma 32 runs to break Sachin Tendulkar’s record for highest runs: आज आशिया चषक २०२३ मधील सुपर फेरीतील शेवटचा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे. १७ सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्धच्या फायनलपूर्वी तयारी म्हणून टीम इंडिया हा सामना पाहणार आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान या स्पर्धेत रोहित शर्माला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे.
कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघ विश्वचषकापूर्वी शेवटच्या वेळी आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे या सामन्यात अनेक विक्रम करण्याच्या प्रयत्नात खेळाडू असतील.आशिया चषक स्पर्धेत रोहित शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो ६४.६६ च्या सरासरीने १९४ धावा करणारा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. या उजव्या हाताच्या फलंदाजाने आतापर्यंत सर्वाधिक अर्धशतके (तीन), सर्वाधिक चौकार (२४) आणि सर्वाधिक षटकार (११) ठोकले आहेत.
सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेत भारतीय फलंदाजाने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडण्यासाठी त्याला आणखी ३२ धावांची गरज आहे. सचिनने १९९०-२०१२ दरम्यान २३ सामन्यांत ९७१ धावा केल्या होत्या. रोहितला आपल्या २७व्या सामन्यात तो मोडण्याची संधी आहे. रोहितने आशिया चषकात आतापर्यंत २६ सामन्यांत ९३९ धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि ९ अर्धशतकांचा समावेश आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो पाचव्या स्थानावर आहे.
हेही वाचा – Asia Cup 2023: पाकिस्तानच्या पराभवाचा भारताला फायदा, फायनलपूर्वी श्रीलंकेने टीम इंडियाला दिली खास ‘भेट’
शाकिब बनणार बांगलादेशचा सर्वोत्तम गोलंदाज –
बांगलादेशचा दिग्गज शाकिब अल हसन अलीकडेच डॅनियल व्हिटोरीला मागे टाकून जगातील दुसरा सर्वाधिक विकेट्स घेणारा डावखुरा फिरकी गोलंदाज बनला आहे. जर त्याने आज त्याच्या १८ व्या आशिया चषक एकदिवसीय सामन्यात दोन विकेट घेतल्या, तर तो सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनेल. या स्पर्धेच्या फॉरमॅटमध्ये तो बांगलादेशचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाजही ठरेल. त्याचबरोबर आणखी एक डावखुरा फिरकी गोलंदाज अब्दुर रझाकचा (१८ सामन्यांमध्येही) २२ विकेट्सचा विक्रम मोडेल. २३ विकेट्ससह, शाकीब क्रमवारीत संयुक्त सहाव्या स्थानावर असेल, तर श्रीलंकेचा चमिंडा वास आणि मुथय्या मुरलीधरन प्रत्येकी 30 विकेट्ससह अव्वल स्थानावर असेल.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, तिलक वर्मा, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, प्रसीध कृष्णा, मोहम्मद शमी.
हेही वाचा – Glenn and Vini Child: ग्लेन मॅक्सवेल झाला बाबा, पत्नी विनी रमनने दिला गोंडस बाळाला जन्म
बांगलादेश : तनजीद हसन तमीम, लिटन दास (यष्टीरक्षक), अनामूल हक, शाकीब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, शमीम हुसेन, मेहदी हसन मिराज, मेहदी हसन, नसुम अहमद, तन्झिद हसन शाकिब, मुस्तफिजुर रहमान.