Rohit Sharma statement on KL Rahul about India Playing XI against Bangladesh : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने १९ सप्टेंबरपासून भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान, हिटमॅनने प्लेइंग इलेव्हनबाबत निर्माण झालेल्या प्रश्नाचे स्पष्टीकरण दिले आहे. पहिल्या कसोटीत सर्फराझ खान की केएल राहुल कोणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाणार? याबाबत त्याने सूचित केले. हिटमॅनने केएल राहुलच्या वाईट टप्प्याबद्दलही प्रतिक्रिया दिली.

टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल गेल्या काही महिन्यांपासून वाईट टप्प्यातून जात आहे. राहुलने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला टीम इंडियासाठी मोलाचे योगदान दिले, परंतु गेल्या काही महिन्यांपासून तो त्याच्या जुन्या शैलीत दिसला नाही. दरम्यान, दुखापतही त्याच्यासाठी अडथळा ठरली. कारण त्याने वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत दमदार पुनरागमन केले, पण नंतर तो दुखापतीचा बळी ठरला. त्याआधी राहुलने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १०१ धावांची उत्कृष्ट खेळी साकारली होती. आता बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीतही केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार असल्याचे रोहितने स्पष्ट केले आहे.

What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Check the List of Highest-Selling Cars of the Year
‘या’ सात सीटर कारला लोकांची सर्वात जास्त पसंती,…
Navi Mumbai Semiconductor project
‘सचिन तेंडुलकर ‘पिच’वरून ‘चीप’वर आले’, एकनाथ शिंदेंची टोलेबाजी
Kamindu Mendis became 1st Sri Lankan player to four fastest centuries in Test
SL vs NZ : कमिंदू मेंडिसने सात कसोटीत झळकावले चौथे शतक, श्रीलंकेसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच फलंदाज
Gautam Gambhir and Virat Kohli on Jasprit Bumrah Mohammed Shami and Mohammed Siraj
Gautam Gambhir : बुमराह, शमी, सिराजसाठी गोलंदाजी हीच ‘ध्यानधारणा व मन:शांती’, गौतम गंभीरचे वक्तव्य
Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
AFG Vs SA Match Afghanistan Won
Afghanistan : अफगाणिस्तानचा दक्षिण आफ्रिकेला दणका; ६ विकेट्सनी विजय

प्रत्येकाच्या करिअरमध्ये चढ-उतार येत असतात – रोहित शर्मा

केएल राहुलच्या चढ-उतारांबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला, ‘प्रत्येकाच्या करिअरमध्ये चढ-उतार येत असतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे स्वत:ला समजून घेणे, तुमच्याकडून तुमच्या अपेक्षा आणि संघासाठी काय महत्त्वाचे आहे. केएल राहुलमध्ये असलेली गुणवत्ता सर्वांनाच माहीत आहे. आमच्या बाजूने त्याचा संदेश असा होता की त्याने सर्व फॉरमॅट खेळावे आणि त्यातून सर्वोत्तम कामगिरी करावी अशी आमची इच्छा आहे. त्यांच्याकडून काय आवश्यक आहे याबद्दल त्याला स्पष्ट संदेश देणे महत्वाचे आहे.’

हेही वाचा – Vinesh Phogat : ‘मी राजकारणात येणार नव्हते, पण जेव्हा…’, विनेश फोगटचा मोठा खुलासा; म्हणाली, ‘मला जाणवले की परिस्थिती…’

केएल राहुल जेथून सोडले होते, तेथून तो पुन्हा सुरुवात करेल –

रोहित शर्मा पुढे म्हणाला, ‘दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावून परतल्यानंतर त्याने चांगली कामगिरी केली होती. दुर्दैवाने हैदराबादमधील सामन्यानंतर त्याला दुखापत झाली आणि त्यानंतर खेळता आले नाही. मला आशा आहे की त्याने हैदराबादमध्ये जेथून सोडले होते तेथून तो पुन्हा सुरुवात करेल. त्याची कसोटी क्रिकेटमध्ये भरभराट होणार नाही, अशी मला कोणतीही कारणं दिसत नाहीत. त्याने करिअर कसे पुढे न्यायचे आहे, हे समजून घेणे आवश्यक असून यासाठी त्याच्याकडे संधी आहे’.

हेही वाचा – Virat Kohli Tweet : विराटचे प्रत्येकी एका शब्दाचे तीन ट्वीट चाहत्यांसाठी ठरले कोडे, कोणाबद्दल आणि काय केली पोस्ट जाणून घ्या?

सर्फराझ खाननेही केली होती शानदार कामगिरी

इंग्लंडविरुद्धच्या पदार्पणाच्या मालिकेत सर्फराझ खानने शानदार फलंदाजी करून सर्वांनाच चकित केले होते. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठीही त्याने संघात स्थान मिळवले आहे. पण प्लेइंग इलेव्हनमध्ये केएल राहुलचे पुनरागमन झाल्याने त्याला बेंचवर बसावे लागू शकते. दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीपासूनही सर्फराझला विश्रांती देण्यात आली नव्हती. पहिल्या कसोटीत तो प्लेइंग इलेव्हनचा भाग नसल्याचा हा मोठा संकेत ठरला.