IND vs BAN 1st Test Rohit Sharma Shubman Gill Video: भारताने बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटीत बांगलादेशला ५१३ धावांचे लक्ष्य दिले आहे. भारताकडून शुबमन गिल आणि ऋषभ पंतने शतकं झळकावत टीम इंडियाला मोठी आघाडी मिळवून दिली. टीम इंडियाने पहिल्या डावात ३७६ धावा केल्या होत्या. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला. यामध्ये रोहित शर्मा शुबमन गिल, विराट कोहली, गौतम गंभीर, अभिषेक नायर हे सर्वजण डगआऊटमध्ये सामना पाहत बसले होते आणि त्याबरोबरच हे लोक मजामस्ती देखील करत होते. तितक्यात रोहितने गिलला बोलता बोलता त्याच्या जबड्यावर मारलं…

हेही वाचा – Rishabh Pant Century: ऋषभ पंतचे ६३३ दिवसांच्या कमबॅकनंतर दणदणीत शतक, थेट धोनीच्या विक्रमाची केली बरोबरी

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Irfan Pathan Showed how Cameraman zoom on fans during live cricket match watch video
Irfan Pathan : लाइव्ह मॅचमध्ये चाहत्यांवर कसा झूम होतो कॅमेरा? इरफान पठाणने शेअर केला खास VIDEO
Virat Kohli & Anushka Sharma visit premanand ji maharaj at vrindavan
Video : विराट कोहली सहकुटुंब पोहोचला वृंदावनमध्ये! प्रेमानंद महाराजांशी काय संवाद झाला? अनुष्का शर्मा म्हणाली, “अनेक प्रश्न…”
Rohit Sharma Completes 14 Years With Mumbai Indians Franchise Shared Special Video for Hitman
Rohit Sharma: IPL 2025 पूर्वी अचानक मुंबई इंडियन्सला आली रोहित शर्माची आठवण, शेअर केला खास VIDEO; काय आहे कारण?
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”
Ajith racing accident
Ajith Kumar : साऊथ सुपरस्टार अजित कुमारचा मोठा अपघात, रेसच्या सरावदरम्यान क्रॅश झाली कार; दुर्घटनेचा Video Viral

रोहित शर्माने शुबमन गिलला मारलं, व्हीडिओ व्हायरल

सामन्याच्या दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला टीम इंडिया फलंदाजी करत होती. यावेळी रविचंद्रन अश्विन आणि आकाश दीप फलंदाजी करत होते. सामना सुरू असताना कॅमेरा मध्येच टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमच्या दिशेने वळवला. यादरम्यान रोहित गिलला काहीतरी समजावत होता आणि बोलता बोलता मस्करी करत शुबमनच्या हनुवटीवर मारलं. तितक्यात बाजूला बसलेल्या विराटने पाहिलं की कॅमेरा भारताच्या ड्रेसिंग रूमकडे वळवलेला आहे. कोहलीने कॅमेरा पाहिल्यावर रोहितला सांगितले. हे पाहून दोघांनाही हसू आवरता आले नाही आणि गंभीरच्या खुर्चीमागे आपलं तोंड लपवलं.

हेही वाचा – IND vs BAN: “मला जडेजाचा हेवा वाटतो, मी त्याच्यासारखा…”, अश्विनचे जडेजाबाबत चकित करणारं वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?

चेन्नईमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यादरम्यान इतरही अनेक मजा मस्तीचे क्षण पाहायला मिळाले. भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये विराट कोहलीच्या बोलण्यावर गौतम गंभीर खळखळून हसताना दिसला. फार क्वचित हसणारा गंभीर संघातील खेळाडूंबरोबर हसताना आणि मजा मस्ती करताना दिसला. तर सामना सुरू असताना बांगलादेशच्या डावात टीम इंडियाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत रवींद्र जडेजाबरोबर मस्करी करत होता. याआधी सामन्याच्या पहिल्या दिवशी अशीच अनेक मजेशीर क्षण पाहायला मिळाली होती.

हेही वाच – VIDEO: “ओए, सगळेजण झोपलेत का…”, भडकलेल्या रोहितने मैदानात खेळाडूला घातली शिवी, स्टंप माईकमध्ये आवाज रेकॉर्ड

टीम इंडियाने पहिल्या डावात ऑलआऊट होईपर्यंत ३७६ धावा केल्या होत्या. अश्विनने पहिल्या डावात शतक झळकावले होते. तर जडेजा आणि अश्विनच्या १९९ धावांच्या भागीदारीने भारताचा डाव सावरला. विराट आणि रोहितला दोन्ही डावात विशेष काही करता आले नाही. तर भारताने बांगलादेशला पहिल्या डावात ऑलआऊट होईपर्यंत १४९ धावा करता आल्या. यादरम्यान जसप्रीत बुमराहने ४ विकेट घेतल्या. तर दुसऱ्या डावात ऋषभ पंत आणि शुबमन गिल या दोघांनाही शतक झळकावत शानदार कामगिरी केली. या दोघांच्या शतकी कामगिरीच्या जोरावर भारताने एकूण ५१३ धावा केल्या आहेत.

Story img Loader