IND vs BAN Rohit Sharma interacts with R Ashwin daughters video viral : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने २८० धावांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो सामनावीर अश्विनच्या कुटुंबियांशी बोलताना दिसला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रोहित अश्विनच्या मुलींशी संवाद साधताना दिसत आहे. यावेळी तियथे अश्विनची पत्नी आणि स्वत: फिरकीपटूही त्यांच्यासोबत उपस्थित होते. आता रोहितच्या या वागण्याचं चाहते कौतुक करत आहेत.
अश्विन ठरला भारताच्या विजयाचा शिल्पकार –
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अश्विनने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने पहिल्या डावात शतक झळकावले होते. त्याने १३३ चेंडूत १३३ धावा केल्या. अश्विन फलंदाजीला आला तेव्हा भारताने पहिल्या डावत १४४ धावांवर ६ विकेट्स गमावल्या होत्या. यानंतर त्याने रवींद्र जडेजासोबत डावाची धुरा सांभाळत संघाला पहिल्या डावात ३७६ धावांपर्यंत नेले. यानंतर दुसऱ्या डावात गोलंदाजीतही योगदान दिले. त्याने बांगलादेशच्या ६ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
रोहितने अश्विनच्या मुलींशी साधला खास संवाद –
सामना संपल्यानंतर अश्विनला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. यादरम्यान रोहित त्याच्या सहकाऱ्यांच्या कुटुंबियांसोबत बोलताना दिसला.रोहित शर्माने अश्विनच्या मुली अकिरा आणि आध्या या दोघींशी खास संवाद साधला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहित अनेकदा असे करताना दिसतो आणि चाहत्यांना त्याचा हा स्वभाव खूप आवडतो. अश्विनच्या मोठ्या मुलीचे नाव अकिरा आहे, तर लहान मुलीचे नाव आध्या आहे. सामन्यादरम्यान अश्विनची पत्नी प्रीती आणि तिच्या मुली स्टेडियममध्ये सपोर्ट करण्यासाठी आल्या होत्या.
रविचंद्रन अश्विनची अष्टपैलू कामगिरी –
सामन्याच्या चौथ्या दिवशी रविवारी बांगलादेश संघाने चार विकेट्सवर १५८ धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली होती. ५२ व्या षटकात शकीब अल हसनला (२५) बाद करून अश्विनने भारताला पाचवे आणि चौथ्या दिवसातील पहिले यश मिळवून दिले. यानंतर बॅटींगला आलेल्या लिटन कुमार दास (१) याला जडेजाने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मेहदी हसन मिराज (८) आणि तस्कीन अहमद (५) अश्विनच्या गळाला लागले.
हेही वाचा – IND vs BAN सामन्यात गोंधळ! मोहम्मद सिराज बांगलादेशच्या कर्णधाराशी भिडला, बोट दाखवतानाचा VIDEO व्हायरल
यानंतर ५७ व्या षटकात जडेजाने कर्णधार नजमुल शांतो (८२) याची विकेट्स घेतली. तसेच ६३ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हसन महमूद (७) बोल्ड झाला आणि बांगलादेशचा दुसरा डाव २३४ धावांवर संपुष्टात आला. या सामन्यात भारताकडून आर अश्विनने ६ विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजाने ३ विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहने एका फलंदाजाला बाद केले.