India vs Bangladesh 2nd Test Day 1 Rohit Sharma Reaction Viral Video: भारत वि बांगलादेशमधील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत बांगलादेशने दोन विकेट्स गमावत ७४ धावा केल्या आहेत. रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने भारताकडून गोलंदाजीला सुरूवात केली. पण भारताला सुरूवातीला विकेट मिळाली नाही. त्यानंतर आलेल्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाने म्हणजेच आकाशदीपने भेदक गोलंदाजी करत विकेट मिळवून दिली. या विकेटनंतर रोहित शर्माच्या प्रतिक्रियेचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

कानपूरमध्ये पावसामुळे सामना थोडा उशिरा सुरू झाला. नाणेफेक झाल्यावर कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने नाणेफेक जिंकली तर ते प्रथम फलंदाजी करतील असे मानले जात होते, पण रोहितचा विचार वेगळा होता. कदाचित ढगाळ वातावरणामुळे, त्याने प्रथम गोलंदाजी घेतली आणि संघात तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश केला.

Chess Olympiad Competition Indian men and women teams win gold sport news
दोन दशकांची प्रतीक्षा संपल्याचा आनंद! बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेतील सुवर्णयशानंतर द्रोणावल्ली हरिकाची भावना
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
IND vs BAN Rishabh Pant sets Bangladesh fielding video viral
IND vs BAN : ऋषभ पंतने फलंदाजी करताना सेट केली बांगलादेशची फिल्डिंग, VIDEO पाहून आवरता येणार नाही हसू
IND vs BAN Shubman Gill fifth Test century against Bangladesh
IND vs BAN : शुबमनने शतक झळकावत भारताचा बाबर म्हणणाऱ्यांची बोलती केली बंद, भारताने बांगलादेशला दिले ५१५ धावांचे लक्ष्य
IND vs BAN Rohit Sharma praises Rishabh Pant
IND vs BAN : ऋषभ पंतने स्फोटक खेळीने जिंकले कर्णधाराचे मन, रोहित शर्मा कौतुक करतानाचा VIDEO व्हायरल
Gautam Gambhir and Virat Kohli on Jasprit Bumrah Mohammed Shami and Mohammed Siraj
Gautam Gambhir : बुमराह, शमी, सिराजसाठी गोलंदाजी हीच ‘ध्यानधारणा व मन:शांती’, गौतम गंभीरचे वक्तव्य
IND vs BAN Rohit Sharma on KL Rahul and Sarfaraz Khan ahead 1st Test match
IND vs BAN : केएल राहुल की सर्फराझ खान? रोहित शर्माने केले स्पष्ट; ‘या’ खेळाडूला मिळणार प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी
Paralympics 2024 Navdeep Singh hug Beit Sayah Sadegh
Paralympics 2024 : सुवर्णपदक जिंकल्यानंतर नवदीप सिंगने केलं असं काही की… प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान

हेही वाचा – IND vs BAN: विराट कोहली २२ वर्षीय नेट बॉलरकडून सलग दोन वेळा बाद; भेदक गोलंदाजी पाहून विराटने विचारलं, “अरे तू किती…”

IND vs BAN: आकाशदीपच्या पहिल्याच षटकात विकेट

सामन्याची आठ षटके झाली होती. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज गोलंदाजी करत होते. दरम्यान, कर्णधार रोहितने आकाश दीपकडे चेंडू सोपवला. दरम्यान, आकाशने त्याच्या पहिल्याच षटकात झाकीर हसनला बाद केले. झाकीरने २४ चेंडू खेळले होते, मात्र त्यानंतरही तो आपले खाते उघडू शकला नाही. म्हणजे बुमराह आणि सिराज जे करू शकले नाहीत, ते आकाशने पहिल्याच षटकात करून दाखवले. यानंतर शादमान इस्लाम चांगली फलंदाजी करत होता. आकाशदीपच्या गोलंदाजीवर यशस्वीने आश्चर्यचकित करणारा झेल टिपत भारताला पहिली विकेट मिळवून दिली.

हेही वाचा – IND vs BAN: रोहित शर्माचा दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकत चकित करणारा निर्णय, ९ वर्षांत पहिल्यांदाच घडली अशी घटना

पहिल्या विकेटनंतर आकाशदीप त्याच्या स्पेलमधील तिसरे षटक टाकण्यासाठी आला. षटकातील पहिल्याच चेंडूवर चेंडू शादमान इस्मालच्या पॅडला लागला. पंचाकडे अपील करण्यात आले, पण त्याला पंचांनी बाद घोषित केले नाही. आकाश दीपला फलंदाज बाद झाल्याची खात्री होती, त्यामुळे त्याने कर्णधार रोहितला डीआरएस घेण्यास सांगितले. ऋषभ पंत, रोहित शर्मा आणि आकाशदीप यांनी मिळून अखेरची दोन सेकंद असताना रिव्ह्यू घेतला आणि डीआरएस घेतला असता इस्माल आऊट असल्याचे दिसले. यावरूनच आकाश दीपचा अंदाज अगदी बरोबर निघाला.

हेही वाचा – SL vs NZ: ८ कसोटी, ८ अर्धशतकं; कामिंदू मेंडिसने रचला विश्वविक्रम, ही कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

Rohit Sharma Reaction Akashdeep DRS Wicket IND vs BAN 2nd Test
आकाशदीपने घेतलेल्या विकेटवर रोहित शर्माची प्रतिक्रिया – (फोटो-बीसीसीआय व्हीडिओ)

पण सुरूवातील बॉल ट्रॅकिंग होत असताना चेंडू स्टंपच्या वरून जात असल्याचे दिसले हे पाहताच रोहित निराश झाला होता. पण बॉल ट्रॅकिंगनंतर आऊट झाल्याचे दिसताच रोहित शर्माने आश्चर्यचकित झाल्याची प्रतिक्रिया दिली. रोहित शर्माच्या या प्रतिक्रियेने निर्णयाचा अंदाज भारताच्या बाजूने लागेल अशी आशा कमी होती, पण आकाशदीपला विश्वास होता आणि तोच खरा ठरला. ही विकेट मिळाल्यानंतर भारतीय खेळाडूंच्या प्रतिक्रियेचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.