India vs Bangladesh 2nd Test Updates: भारत वि बांगलादेश दुसरा कसोटी सामना पावसामुळे उशिरा झाला. तर सामन्याची नाणेफेकही १ तास उशिराने झाली. भारताने बांगलादेश विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय कर्णधार रोहित शर्माने आणखी एक धक्कादायक निर्णय घेतला. कानपूर कसोटीसाठी संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. याचाच अर्थ कानपूरच्या घरच्या मैदानावर खेळण्यासाठी कुलदीप यादवला अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर अशी एक घटना घडली आहे, जी गेल्या ९ वर्षात प्रथमच घडली आहे.

भारतीय संघाने ५ वर्षांनंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर याव्यतिरिक्त भारतीय संघाने घरच्या भूमीवर ९ वर्षांनंतर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कानपूरमध्ये दुसऱ्यांदा अशी घटना घडली. भारताने घरच्या भूमीवर १४व्यांदा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. १४ सामन्यांपैकी ४ वेळा प्रथम गोलंदाजी करताना भारताने सामना गमावला आहे. बांगलादेशविरुद्धच्या कानपूर कसोटीपूर्वी २०१५ मध्ये हा प्रकार घडला होता. भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना अनिर्णित राहिला. त्यावेळेस विराट कोहली कर्णधार होता.

हेही वाचा – IND vs BAN: विराट कोहली २२ वर्षीय नेट बॉलरकडून सलग दोन वेळा बाद; भेदक गोलंदाजी पाहून विराटने विचारलं, “अरे तू किती…”

IND vs BAN: भारताने ६० वर्षांनंतर कानपूर कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला

कानपूरमधील २४ कसोटी सामन्यांमध्ये ही दुसरी वेळ आहे की एखाद्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी १९६४ मध्ये (इंग्लंडविरुद्ध) असे घडले होते. सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये भारताने प्रथमच नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. १९९७ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची मालिका एकमेव मालिका होती ज्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा – IPL 2025: गौतम गंभीरच्या जागी धोनीचा खास मित्र, KKRचा मोठा निर्णय

IND vs BAN: बांगलादेशच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल

भारताने २०१९ मध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल न करता सलग दोन मायदेशी कसोटी सामने खेळले होते. बांगलादेशविरुद्ध इंदूर आणि कोलकाता कसोटीत असं घडलं होतं. यानंतर आता २०२४ कानपूर कसोटीत भारताने सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केलेला नाही. बांगलादेश संघाने प्लेइंग इलेव्हन मध्ये २ बदल केले आहेत. तस्किन अहमद आणि नाहिद राणा यांच्या जागी तैजुल इस्लाम आणि खालिद अहमद यांना संधी मिळाली.

हेही वाचा – IND vs BAN: दुसऱ्या कसोटीत ९३ टक्के पावसाची शक्यता, कानपूरचू खेळपट्टी कोणाला करणार मदत? वाचा हवामान आणि पिच रिपोर्ट

भारताची प्लेइंग इलेव्हन:

यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

बांगलादेशची प्लेइंग इलेव्हन:

शादमान इस्लाम, झाकीर हसन, नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद.