India vs Bangladesh Live Telecast, Cricket World Cup 2023: विश्वचषक सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पाच विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळत नाहीये. शमी हा खूप चतुर गोलंदाज आहे, पण विश्वचषकाच्या सध्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला स्थान मिळेल का? यावर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपल्या संघातील खेळाडूंविषयी आपली भूमिका स्पष्ट केली असून त्यानुसार काम केले जात आहे, असे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आतापर्यंतच्या विश्वचषकात शमीला तीनही सामन्यांत संधी मिळालेली नाही. आता भारतीय संघ गुरुवारी पुण्यात बांगलादेशशी दोन हात करणार आहे. विश्वचषकातील शमीची कामगिरी पाहता त्याच्या नावावर उत्कृष्ट रेकॉर्ड आहे. त्याने आतापर्यंत ११ सामन्यात ३१ विकेट्स घेतल्या आहेत, असे असूनही तो बाहेरच बसला आहे. सिराज आणि बुमराह नव्या चेंडूने चांगली गोलंदाजी करत आहेत. दुसरीकडे, अष्टपैलू हार्दिक पांड्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका चोख बजावत आहे. मुंबईचा शार्दुल ठाकूरने शेवटचे दोन सामने खेळून एकूण आठ षटके टाकली आहेत.

हेही वाचा: World Cup 2023: गौतम गंभीरने बाबर आझमला दिला खास सल्ला; म्हणाला, “पाकिस्तानसाठी तुम्ही किती धावा करता यापेक्षा…”

सूर्यकुमार यादवलाही प्रतीक्षा करावी लागणार आहे

शार्दुल संघासाठी चौथ्या वेगवान गोलंदाजाचा पर्याय देत आहे. फिरकीचा ट्रॅक असेल तर कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजासह शार्दुलच्या जागी अश्विनला संधी दिली जाते. त्याचप्रमाणे श्रेयस अय्यर तंदुरुस्त झाल्यानंतर चांगली कामगिरी करत असून सूर्यकुमार यादवला संघात स्थान मिळण्याची वाट पाहावी लागणार आहे. गिलच्या अनुपस्थितीत इशान किशनला सलामीचा पर्याय उपलब्ध आहे. कर्णधार रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करत आहे.

एम.एस.के प्रसाद यांनी संघ व्यवस्थापनाचे कौतुक केले

माजी राष्ट्रीय निवडकर्ता एम.एस.के प्रसाद म्हणाले की, “संघ व्यवस्थापन चांगले काम करत आहे. अश्विन आणि शार्दुलचा चांगला वापर केला आहे. मला वाटते की प्लेइंग इलेव्हनमध्ये सिराजच्या जागी शमीला स्थान मिळू शकते. संघ व्यवस्थापनाला सिराजला विश्रांती द्यायची असेल तर शमीला संधी मिळू शकते.”

हेही वाचा: SA vs NED: उबर ईट्स डिलिव्हरी बॉय नेदरलँड्सच्या विजयाचा नायक कसा बनला, कोण आहे तो? जाणून घ्या

विश्वचषकासाठी दोन्ही संघ

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

बांगलादेश : शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तनजीद हसन तमीम, नजमुल हुसेन शांतो (उपकर्णधार), तौहीद हृदयॉय, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मेहदी हसन मिराज, नसुम अहमद, शाक महेदी हसन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, शोरीफुल इस्लाम, तन्झीम हसन साकीब.