IND vs BAN Shubman Gill On Batting At No. 3 : टीम इंडियाचा युवा फलंदाज शुबमन गिल भारताच्या आंतरराष्ट्रीय होम सीझनपूर्वी दुलीप ट्रॉफी २०२४ मध्ये खेळत आहे. यादरम्यान त्याने सांगितले की, स्वतःच्या सहकारी खेळाडूंशी स्पर्धा करण्यात मजा येते. गिलने हे देखील सांगितले आहे की कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर खेळणे किती मोठे आव्हान आहे, कारण तो सुरुवातीला सलामीवीर म्हणून खेळत होता आणि चेतेश्वर पुजाराला कसोटी संघातून वगळल्यानंतर त्याने स्वतः तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, तिसऱ्या क्रमांकावर त्याला फारसे यश मिळाले नाही. तो स्वतः हे मान्य करतो.

कसोटी सामन्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना येणाऱ्या आव्हानांबद्दल जिओ सिनेमाशी बोलताना शुबमन गिल म्हणाला, “अनेकदा, जेव्हा तुम्ही वेगळ्या क्रमांकावर खेळत असता तेव्हा प्रत्येकाला तुमची क्षमता माहीत असते, पण तरीही तुम्हाला स्वत:ला पुढे सिद्ध करावे लागते. सुरुवातीचे सामने, जेव्हा मी तिसऱ्या क्रमांकावर खेळलो, तेव्हा मी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगली कामगिरी करू शकलो नाही.”

शुबमन गिल पुढे म्हणाला, “माझी सुरुवात चांगली होत होती, मी २० आणि ३० धावा काढत होतो, पण मी त्यांचे मोठ्या डावात रूपांतर करू शकलो नाही. जेव्हा मी परतलो तेव्हा मला माहित होते की मला ही कामगिरी बदलायची आहे. पुढे जाऊन माझे अर्धशतकांचे मोठ्या शतकांमध्ये रूपांतर करण्याचे माझे ध्येय आहे.”

हेही वाचा – Duleep Trophy 2024 : विक्रमांचा ‘ध्रुव’तारा; जुरेलने केली महेंद्रसिंग धोनीच्या २० वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी

दुलीप करंडक स्पर्धेबद्दल बोलताना, २४ वर्षीय खेळाडूने स्पर्धेपूर्वी सांगितले होते, “हे मजेदार होणार आहे. जेव्हा जेव्हा आम्ही एक संघ म्हणून एकत्र येतो, तेव्हा आम्ही एकमेकांविरुद्ध खेळण्यासाठी उत्सुक असतो आणि त्याबद्दल बोलत असतो. ही फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी ही उत्तम संधी आहे. कारण ते खूप स्पर्धात्मक आणि उत्तम वातावरणही असेल.”

Story img Loader