IND vs BAN Shubman Gill scored fifth Test century in the first match against Bangladesh : शनिवारी चेन्नई येथे बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शुबमन गिलने शतक झळकावून भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणले. यशस्वी जैस्वाल संघात आल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर खेळत असलेल्या गिलने या स्थानावर चमकदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. पहिल्या डावात खाते न उघडता बाद झालेल्या या फलंदाजाने दुसऱ्या डावात १६१ चेंडूत शतक झळकावले. त्याचे हे कसोटी कारकीर्दीतील पाचवे शतक आहे. त्याने या शतकाच्या जोरावर आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. यानंतर कर्णधार रोहित शर्माने भारताचा दुसरा डाव ४ बाद २८७ धावांवर घोषित केला. आता भारताकडे ५१४ धावांची आघाडी आहे.

शुबमन गिलने दुसऱ्या डावात सलग चौथ्यांदा ५० हून अधिक धावा केल्या. इंग्लंडविरुद्धच्या विशाखापट्टणम कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने १०४ धावांची खेळी केली होता. त्याने राजकोटमध्ये दुसऱ्या डावात ९१ धावांची खेळी केली होती. रांचीमध्ये दुसऱ्या डावात त्याने नाबाद ५२ धावा केल्या होत्या. गिलने गेल्या ८ कसोटी डावांमध्ये ३ शतके आणि २ अर्धशतके झळकावली आहेत. त्याने २०२४ मध्ये आतापर्यंत ३ शतके झळकावली आहेत. शुबमन गिलने १७६ चेंडूंचा सामना करताना १० चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने नाबाद ११९ धावा केल्या.

शुबमनने शतक झळकावत भारताचा बाबर म्हणणाऱ्यांची बोलती केली बंद –

विशेष म्हणजे  शुबमन गिल पहिल्या डावात शून्यावर बाद झाला होता, तेव्हा सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. त्याला आठव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हसन महमूदने गिलला लिटन दासकरवी झेलबाद केले होते. गिल कसोटीत शून्यावर बाद होण्याची ही पाचवी वेळ होत. ज्यामुळे चाहते या २५ वर्षीय फलंदाजाच्या खराब कामगिरीवर संतापले होते. सोशल मीडियावर काही चाहत्यांनी त्याला भारताचा बाबर आझम असेही म्हटले होते. पण आता शुबमन गिलने शतक झळकावून या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा – Virat Kohli : ‘यॉर्करवर यॉर्कर टाकतोयस, तू काय मलिंगा…’, विराटने शकीबला विचारलेला प्रश्न स्टंप माईकमध्ये कैद, VIDEO व्हायरल

शुबमन गिलने पंतसोबत केली १६७ धावांची भागीदारी –

चेन्नई कसोटीत भारताच्या दुसऱ्या डावात शुबमन गिलने १६१ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने शतक झळकावले. गिलने ऋषभ पंतसोबत १०९ चेंडूत १६७ धावांची भागीदारी केली. चेन्नई कसोटीच्या तिसऱ्या दिवशी या दोन्ही फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांना विकेट्ससाठी प्रचंड दमवले. मात्र, यानंतर ऋषभ पंत १२८ चेंडूत १०९ धावा करुन चौथ्या विकेट्सच्या रुपाने बाद झाला. यानंतर फलंदाजील आलेला केएल राहुल नाबाद २२ धावांसह माघारी परतला. भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात २८७ धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला. त्यामुळे आता भारताची आघाडी ५१४ धावांची झाली आहे.