IND vs BAN Suryakumar Yadav become 2nd fastest Indian player to score 2500 runs in T20I : भारत आणि बांगलादेश यांच्यात हैदराबादमध्ये तिसरा टी-२० सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाला तिसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला पण संजू सॅमसन आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी डावाची जबाबदारी स्वीकारली. यानंतर दोन्ही फलंदाजांनी बांगलादेशी गोलंदाजांची धुलाई करत अवघ्या ७.१ षटकांत १०० धावा केल्या. यादरम्यान कर्णधार सूर्यकुमार यादवने ३१ धावा पूर्ण करत रोहित शर्माला मागे टाकत एक मोठा पराक्रम केला आहे.
वास्तविक, सूर्यकुमार यादवने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५०० धावांचा टप्पा गाठला आहे. सूर्याने रोहित शर्माचा टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वात जलद २५०० धावा करण्याचा विक्रमही मोडला आहे. ही कामगिरी करणारा सूर्या भारताचा दुसरा तर जगातील चौथा फलंदाज ठरला आहे. सूर्याने केवळ ७१व्या डावात हा टप्पा गाठला तर रोहितने २५०० धावा पूर्ण करण्यासाठी ९२ डाव घेतले होते. रिशाद हुसेनने सूर्यकुमारला बाद करून बांगलादेशला तिसरे यश मिळवून दिले. सूर्यकुमार ३५ चेंडूंत आठ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ७५ धावा करून बाद झाला.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २५०० धावा पूर्ण करणारे फलंदाज –
बाबर आझम- ६२
मोहम्मद रिझवान- ६५
विराट कोहली- ६८
सूर्यकुमार यादव- ७१
हेही वाचा – IND vs BAN : ६,६,६,६,६…संजू सॅमसनने केला कहर, एकाच षटकात तब्बल इतक्या षटकारांचा पाडला पाऊस, पाहा VIDEO
संजू सॅमसनने भारतासाठी दुसरे सर्वात जलद शतक झळकावले –
संजू सॅमसनने या सामन्यात केवळ दमदार शतकच केले नाही तर एक मोठा विक्रमही रचला आहे. संजू सॅमसनने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी दुसरे सर्वात जलद शतक झळकावले. भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम आजही टीम इंडियाचा माजी टी-२० कर्णधार रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात अवघ्या ३५ चेंडूत शतक झळकावले. संजूने या सामन्यात एकूण ४७ चेंडूत ११ धावा केल्या. यादरम्यान त्याने ११ चौकार आणि ८ षटकारही मारले. संजूच्या या खेळीमुळे भारतीय संघाने या सामन्यात २० षटकात २९७ धावा केल्या. जी टी-२० आंतरराष्ट्रीय मधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे.