IND vs BAN Morne Morkel Unhappy on Hardik Pandya Bowling : बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी अष्टपैलू हार्दिक पंड्या टीम इंडियात परतला आहे. पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी हार्दिक पंड्याने नेटमध्ये खूप घाम गाळला. फलंदाजीनंतर हार्दिकने बॉलिंगमध्येही मेहनत घेतली, पण गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल या भारतीय अष्टपैलू खेळाडूवर खूश नसल्याच्या बातम्या येत आहेत. नेटमध्ये गोलंदाजी करताना मॉर्केलने हार्दिकवर बारीक नजर ठेवली. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

रिपोर्टनुसार, हार्दिक पंड्या जेव्हा नेटमध्ये गोलंदाजी करत होता, तेव्हा तो वारंवार चुका करत होता. त्यावेळी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल हार्दिकच्या गोलंदाजीवर बारीक लक्ष ठेवून होते. वास्तविक, गोलंदाजी करताना हार्दिक स्टंपच्या अगदी जवळून गोलंदाजी करत होता. हार्दिकला हे करताना पाहून मॉर्केल त्याच्याशी चर्चा केली आणि त्याच्यातील कमतरता सांगितल्या. यानंतर मॉर्केलने हार्दिकचा ‘रिलीज पॉइंट’ही दुरुस्त केला. या सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हार्दिकने त्याच्या उणिवा दूर करत सुधारणा केल्या. ज्याचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियामध्ये हार्दिक पंड्यासाठी सर्व काही ठीक चालले नाही. श्रीलंका दौऱ्याच हार्दिक पंड्याची कामगिरी खास राहिली नव्हती. अशा परिस्थितीत बांगलादेशविरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत त्याच्यावर नजर असेल. हार्दिकला पर्याय म्हणून टीम इंडियाने नितीश रेड्डीसारख्या अष्टपैलू खेळाडूचा समावेश केला आहे, ज्याकडे मध्यमगती गोलंदाजीसह वेगवान धावा करण्याची क्षमता आहे.

हेही वाचा – Womens T20 WC 2024 : श्रीलंका-पाक सामन्यात रुमाल पडल्याने फलंदाजाला मिळाले जीवदान, नेमकं कारण काय? जाणून घ्या

अशा परिस्थितीत हार्दिक पंड्यासाठी आव्हान खूपच कठीण असणार आहे. जर हार्दिक पंड्या गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीमध्ये प्रभावी नसेल, तर कदाचित संघ व्यवस्थापन त्याच्या पर्यायांचा शोध घेण्यास मागेपुढे पाहणार नाही. मात्र, हार्दिक पंड्याने यंदाच्या आयसीसी टी-२० विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली होती.

हेही वाचा – IND vs BAN 1st T20 सामन्यापूर्वी ग्वाल्हेरमध्ये वाढवली सुरक्षा, नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या

बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि मयंक यादव.