Ind vs Ban Women’s T20I: टीम इंडियाचा महिलांचा संघ बांगलादेश दौऱ्यासाठी सज्ज झाला असून येत्या २८ एप्रिलपासून बांगलादेश विरुद्ध भारत असे पाच सामने सिल्हेटमध्ये पार पडणार आहेत. प्राप्त माहितीनुसार, तीन सामने हे रात्रीचे असल्याने मुख्य स्टेडियममध्ये पार पडतील तर दोन (दिवसांचे) सामने हे बाहेरील मैदानात होतील. स्थानिक वेळेनुसार रात्रीचे सामने संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सुरु होतील तर दिवसाचे दोन सामने दुपारी २ ला खेळवले जाणार आहेत. बांगलादेश विरुद्धची ही मालिका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बांगलादेशमध्येच खेळवल्या जाणाऱ्या २०२४ T20 विश्वचषक स्पर्धेची तयारी असल्याने भारतीय संघाच्या खेळीकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

मागील दोन वर्षांतील भारताचा हा दुसरा बांगलादेश दौरा आहे आणि एकूण तिसरा दौरा आहे. २०२३ मध्ये, टीम इंडिया तीन T20I आणि एकदिवसीय सामने खेळली होती. यामध्ये T20I मालिका 2-1 ने त्यांना आपल्या नावे करता आली होती मात्र एकदिवसीय मालिकेत दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी केली होती. हा एकदिवसीय सामना लक्षात राहण्याचे एक कारण म्हणजे एकदिवसीय मालिकेतील या शेवटच्या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने पंचांवर टीका करताना तिच्या बॅटने स्टंप फोडले होते. सामन्यानंतरही तिने पंचांचे निर्णय हे कीव येण्यासारखे होते असं म्हणत टीकास्त्र चालवले होते. भारताची उपकर्णधार स्मृती मंधाना हिनेही पुढील दौऱ्यासाठी ‘तटस्थ पंच’ लाभतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

Morya Gosavi Sanjeev Samadhi Festival begins in chinchwad Pune news
पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
IND vs AUS 3rd Test Match Timing Date Venue What Time Does the Gabba Test Start
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या योग्य वेळ
IND vs AUS 3rd Test Rain to Play Spoilsport in Brisbane Weather Update India WTC Qualification
IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?
Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
Six Bangladeshi women arrested from Bhiwandi
Bangladeshi women arrested : भिवंडीतून सहा बांगलादेशी महिलांना अटक
U19 Asia Cup Final Bangladesh Beat India by 59 Runs And Successfully Defend the Title INDU19 vs BANU19
IND U19 vs BAN U19: बांगलादेशची पोरं हुशार; युवा भारतीय संघाला नमवत पटकावलं U19 आशिया कपचं जेतेपद

हरमनप्रीत कौर तेव्हा असं म्हणाली होती की, “पुढच्या वेळी जेव्हा आम्ही बांगलादेशात येणार आहोत तेव्हा आम्हाला खात्री करून घ्यावी लागेल की आम्हाला अशा प्रकारच्या अंपायरिंगला सामोरे जावे लागेल आणि त्यानुसार आम्हाला स्वतःला तयार करावे लागेल,” तिच्या या कृतींमुळे तिच्यावर आयसीसीने दोन सामन्यांची बंदी सुद्धा घातली होती.

<< आयपीएल संबंधित सर्व अपडेट्स एका क्लिकवर वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान, या कटू प्रसंगानंतर आता पहिल्यांदाच भारतीय संघ २३ एप्रिलला बांगलादेशात पोहोचणार आहे. यावेळचा दौरा भारतीय संघाच्या कामगिरीमुळे गाजणार की पुन्हा असे वादग्रस्त प्रसंग पाहायला मिळणार हे २८ एप्रिलपासून आपल्याला पाहायला मिळेल.

भारत विरुद्ध बांगलादेश दौऱ्याचे वेळापत्रक (महिलांचा संघ)

२८ एप्रिल – पहिला सामना (रात्री)
३० एप्रिल – दुसरा सामना (रात्री)
२ मे – तिसरा सामना (दिवस)
६ मे – चौथा सामना (दिवस)
९ मे – पाचवा सामना (रात्री)

Story img Loader