IND vs BAN Team India broke Afghanistan record highest score in T20I : भारत आणि बांगलादेश यांच्यात तिसरा टी-२० सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजी केली. या सामन्यात टीम इंडियाने २० षटकात ६ गडी गमावून २९७ धावा केल्या. या धावंसख्येच्या जोरावर टीम इंडियाने मोठा पराक्रम केला आहे. पूर्ण सदस्य राष्ट्रातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. टीम इंडियाने अफगाणिस्तानचा रेकॉर्ड मोडला आहे. अफगाणिस्तानने २०१९ मध्ये आयर्लंडविरुद्ध २७८ धावा केल्या होत्या. संजू सॅमसनच्या शानदार खेळीमुळे भारताने या सामन्यात एवढी मोठी धावसंख्या उभारली. त्याने ४७ चेंडूत १११ धावांची तुफानी खेळी साकारली.

२०२३ मध्ये मंगोलियाविरुद्ध ३१४ धावा करणाऱ्या नेपाळच्या नावावर टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आहे. त्यामुळे आता क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्येची नोंद टीम इंडियाच्या नावावर झाली आहे. भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यापूर्वी, चेक प्रजासत्ताक या यादीत दुसऱ्या स्थानावर होता, ज्याने २०१९ मध्ये तुर्कीविरुद्धच्या सामन्यात २७८ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. आता हा विक्रम टीम इंडियाने मागे टाकला आहे.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या नोंदवणारे देश :

  • ३१४/३ – नेपाळ विरुद्ध मंगोलिया, हांगझोऊ, २०२३
  • २९७/६ – भारत विरुद्ध बांगलादेश, हैदराबाद, २०२४
  • २७८/३ – अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड, डेहराडून, २०१९
  • २७८/४ – झेक प्रजासत्ताक विरुद्ध तुर्की, इल्फोव्ह काउंटी, २०१९
  • २६८/4 – मलेशिया विरुद्ध थायलंड, हांगझोऊ, २०२३
  • २६७/३ – इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज, तारौबा, २०२३

सर्वात वेगवान संघ शतक –

भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात जलद सांघिक शतक ठोकण्याचा विक्रमही केला आहे. टीम इंडियाने १०० धावांचा टप्पा अवघ्या ७.१ षटकांत पूर्ण केला, हाही एक नवा विश्वविक्रम आहे. यासोबतच टीम इंडियाने १० ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही केला आहे. १० षटकांत संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव या जोडीने भारतीय धावफलकावर १५२ धावांची मजल मारली.