India vs Bangladesh 3rd T20I Highlights in Marathi: भारतीय संघाने बांगलादेशचीा तिसऱ्या टी-२० सामन्यात १३३ धावांनी मोठा पराभव केला आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना विक्रमी ६ बाद २९७ धावा केल्या आहेत. ही विक्रमी धावसंख्या उभारताना भारताने अनेक मोठे विक्रम मोडत काही नवे विक्रमही आपल्या नावे केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हैदराबादमध्ये तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय डावाची सुरुवात सामान्य झाली. टीम इंडियाला पहिला धक्का तिसऱ्याच षटकात अभिषेक शर्माच्या रूपाने बसला. तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर तनझीम हसनने अभिषेक शर्माला अवघ्या ४ धावांवर बाद केले. यानंतर संजू सॅमसन आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी आघाडी घेत बांगलादेशी गोलंदाजांची बेदम धुलाई केली की त्यांनी विक्रमांची मालिका रचली. संजू आणि सूर्याने मिळून पॉवरप्लेमध्ये तुफानी फटकेबाजी करत ८२ धावा केल्या. अशा प्रकारे टीम इंडियाने टीम इंडियाने पॉवरप्लेमधील सर्वोच्च धावसंख्येची बरोबरी केली.

हेही वाचा – SL W vs NZ W: न्यूझीलंडच्या विजयाने टीम इंडियाच्या अडचणीत वाढ, सेमीफायनल गाठण्यासाठी आता फक्त एकच मार्ग!

T20I मधील पॉवरप्लेमध्ये भारताची सर्वात मोठी धावसंख्या

८२/१ वि बांगलादेश, हैदराबाद, २०२४
८२/२ वि स्कॉटलंड, दुबई, २०२१
७८/२ वि दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, २०१८
७७/१ वि ऑस्ट्रेलिया, तिरुवनंतपुरम, २०२३
७७/१ वि श्रीलंका, नागपूर, २००९

पॉवरप्लेमध्ये धावांचा डोंगर उभारल्यानंतर भारतीय संघाने अवघ्या ७.१ षटकांत १०० धावांचा टप्पा गाठला. T20I इतिहासात कोणत्याही संघाकडून सर्वात जलद १०० धावा करण्याचा हा विक्रम आहे. संघाचे शतक पूर्ण होताच भारतीय संघाने दीडशे धावांचा टप्पा केव्हा गाठला याचा अंदाजच आला नाही. १० व्या षटकात संजूने रिशाद हुसेनच्या गोलंदाजीवर वादळी फलंदाजी केली. या षटकात संजूने सलग ५ षटकार ठोकले. अशाप्रकारे संघाने १० षटकांत १ गडी गमावून १५२ धावा केल्या. पहिल्या १० षटकांनंतरची ही टी-२० क्रिकेटमधील सर्वात मोठी धावसंख्या आहे.

हेही वाचा – Hardik Pandya: “अखेर मला असा कोणीतरी भेटला…”, म्हणत ‘या’ भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीने शेअर केले हार्दिक पंड्याबरोबरचे फोटो

T20I मध्ये पहिल्या १० षटकांनंतर सर्वोच्च धावसंख्या

१५६/३ – ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्कॉटलंड, एडिनबर्ग, २०२४
१५४/४ – एस्टोनिया वि सायप्रस, एपिस्कोपी, २०२४
१५२/१ – भारत विरुद्ध बांगलादेश, हैदराबाद, २०२४
१४९/0 – दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडीज, सेंच्युरियन, २०२३
१४७/१ – न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, ऑकलंड, २०१६

संघाने १५० धावा पूर्ण केल्यानंतर काही वेळातच, संजू सॅमसननेही T20I क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा तो रोहित शर्मानंतरचा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. संजूने ४० चेंडूत शतक ठोकले तर रोहितने ३५ चेंडूत ही कामगिरी केली आहे.

सर्वात वेगवान T20I शतक (पूर्ण सदस्य संघ)

३५ – डेव्हिड मिलर (SA) विरुद्ध BAN, पॉचेफस्ट्रूम, २०१७
३५ – रोहित शर्मा (IND) विरुद्ध SL, इंदूर, २०१७
३९ – जॉन्सन चार्ल्स (WI) विरुद्ध SA, सेंच्युरियन, २०२३
४० – संजू सॅमसन (IND) विरुद्ध BAN, हैदराबाद, २०२४
४२ – हजरतुल्ला झाझाई (एएफजी) विरुद्ध IRE, डेहराडून, २०१९
४२ – लियाम लिव्हिंगस्टोन (ENG) विरुद्ध PAK, ट्रेंट ब्रिज, २०२१

हेही वाचा – IND vs BAN : सूर्याने रोहित शर्माला मागे टाकत केला मोठा पराक्रम, ‘ही’ खास कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय खेळाडू

संजूने झंझावाती शतक झळकावले, तर कर्णधार सूर्याने झटपट अर्धशतक झळकावले. संजूने १११ धावांची तर सूर्याने ७५ धावांची तुफानी खेळी खेळली. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी १७३ धावांची भागीदारी झाली. टी-२० क्रिकेटमध्ये कोणत्याही विकेटसाठी भारताची ही तिसरी सर्वोच्च भागीदारी आहे.

T20I मध्ये भारतासाठी सर्वोच्च भागीदारी (कोणत्याही विकेटसाठी)

१९०* – रोहित शर्मा आणि रिंकू सिंग विरुद्ध अफगाणिस्तान, बेंगळुरू, २०२४
१७६ – संजू सॅमसन आणि दीपक हुडा विरुद्ध आयर्लंड, मलाहाडे, २०२२
१७३ – संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव विरुद्ध बांगलादेश, हैदराबाद, २०२४
१६५ – रोहित शर्मा आणि केएल राहुल विरुद्ध श्रीलंका, इंदूर, २०१७
१६५ – यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल विरुद्ध वेस्ट इंडिज, लॉडरहिल, २०२३

संजू आणि सूर्याच्या शानदार खेळामुळे आणि त्यानंतर हार्दिक पंड्याच्या तुफानी खेळीमुळे भारतीय संघ टी-२० मध्ये आपली सर्वोत्तम धावसंख्या उभारण्यात यशस्वी झाला. भारतीय संघ ३०० धावांचा टप्पा गाठू शकला नसला तरी, त्यांनी टी-२० क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या उभारली. टीम इंडियाने ६ गडी गमावून २९७ धावा केल्या.

T20I मधली सर्वोच्च सांघिक धावसंख्या (T20I Highest Score)

३१४/३ – नेपाळ विरुद्ध मंगोलिया, हांगझोऊ, 2023
२९७/६ – भारत विरुद्ध बांगलादेश, हैदराबाद, २०२४
२७८/३ – अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड, डेहराडून, २०१९
२७८/४ – झेक प्रजासत्ताक विरुद्ध तुर्किये, इल्फोव्ह काउंटी, २०१९
२६८/४ – मलेशिया विरुद्ध थायलंड, हांगझोऊ, २०२३
२६७/३ – इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, तरोबा, २०२३

हेही वाचा – Sanju Samson: संजू सॅमसनचे पहिले टी-२० शतक, रोहितचा मोठा विक्रम मोडत ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय फलंदाज

भारताकडून या सामन्यात चक्क चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला. भारताच्या डावात एकूण ४७ चौकार मारले गेले. अशाप्रकारे टीम इंडियाने टी-२० च्या एका डावात सर्वाधिक चौकार मारण्याचा विश्वविक्रम केला. यापूर्वी हा विक्रम ४३ चौकारांचा होता.

T20I डावात सर्वाधिक चौकार

४७ – भारत विरुद्ध बांगलादेश, हैदराबाद, २०२४
४३ – झेक प्रजासत्ताक विरुद्ध तुर्किए, इल्फोव्ह काउंटी, २०१९
४२ – दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, सेंच्युरियन, २०२३
४२ – भारत विरुद्ध श्रीलंका, इंदूर, २०१७
४१ – श्रीलंका विरुद्ध केनिया, जोहान्सबर्ग, २००७
४१ – अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड, डेहराडून, २०१९