IND vs BAN Team India squad announced for 2nd test match against Bangladesh : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईत पार पडला. या सामन्याच्या चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी भारताने बांगलादेशवर २८० धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजायसह भारताने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता २७ सप्टेंबरपासून ग्रीन पार्क, कानपूर येथे उभय संघांमध्ये दुसरा आणि अंतिम कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे.

भारताने या कसोटी सामन्यासाठी तोच संघ कायम ठेवला आहे, जो पहिल्या कसोटी सामन्यासाठी जाहीर करण्यात आला होता. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुसऱ्या कसोटीतून विश्रांती दिली जाईल, असे मानले जात होते, मात्र निवड समितीने त्याचाही संघात समावेश केला आहे. बुमराह व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज यश दयाल आणि आकाश दीप यांनीही आपली जागा कायम ठेवली आहे, तर सर्फराझ खान आणि यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल देखील संघासोबत प्रवास करतील.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर –

चेन्नई कसोटीत भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरला होत. या सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमध्ये यश दयालला स्थान मिळाले नव्हते. आता कानपूर कसोटीसाठी सामन्यासाठी रोहित संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करतो की, त्याच संघासोबत पुढे जाण्याचा निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा – IND vs BAN : रविचंद्रन अश्विनने ऐतिहासिक शतकासह लावली विक्रमांची रांग, पाहा पराक्रमांची यादी

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराझ खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.