IND vs BAN Best Fielder Medal Video: बहुप्रतिक्षित असा बेस्ट फिल्डरला मेडल देतानाचा भारतीयय संघाचा व्हीडिओ बीसीसीआयने पोस्ट केला आहे. बांगलादेशविरूद्धच्या मालिकेत संघातील सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले. तर काही खेळाडूंनी त्यांच्या कॅच आणि क्षेत्ररक्षणाने सर्वांनाच प्रभावित केले. रोहित शर्मा, मोहम्मद सिराज, यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांना बेस्ट फिल्डर मेडलसाठी नॉमिनेट केले आहेत. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे खेळाडूंची कामगिरी पाहून पहिल्यांदाच दोन मेडल देण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बेस्ट फिल्डर मेडल देण्याची परंपरा वनडे वर्ल्डकप २०२३ पासून सुरू करण्यात आली होती. वर्ल्डकपच्या प्रत्येक सामन्यानंतर त्या सामन्यातील खेळाडूला बेस्ट फिल्डरचे मेडल दिले जात होते. वनडे वर्ल्डकपनंतर आता होणाऱ्या प्रत्येक द्विपक्षीय मालिकेत जो खेळाडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करेल त्याला हे मेडल दिले जाते. पण पहिल्यांदाच खेळाडूंची कामगिरी पाहता दोन बेस्ट फिल्डर मेडल देण्यात आले आहेत.

हेही वाचा – IND vs BAN: “भले आम्ही १०० वर ऑल आऊट झालो असतो पण…”, भारताच्या विजयानंतर रोहित शर्माचं मोठं विधान, नेमकं म्हणाला तरी काय?

कोण ठरले दोन बेस्ट फिल्डर?

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले. कानपूर कसोटीत कर्णधार रोहित शर्माने लिटन दासच्या शॉटचा एका हाताने अप्रतिम झेल टिपला. या झेलनंतर काही वेळातच वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने मागच्या बाजूला उडी घेत शाकिब अल हसनचा अप्रतिम झेल घटिपला. यशस्वी जैस्वालने शॉर्ट लेग आणि स्लिपमध्येही उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले. केएल राहुलनेही उत्कृष्ट झेल घेतले.

हेही वाचा – WTC Points Table मध्ये भारताची मोठी झेप, अंतिम फेरीसाठी दावेदारी मजबूत

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी क्षेत्ररक्षण पदकासाठी ४ खेळाडूंची निवड केली. ज्यात त्यांनी यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, मोहम्मद सिराज आणि केएल राहुल यांच्या क्षेत्ररक्षणाचे कौतुक केले. यावेळी त्यांनी दोन खेळाडूंना पदकं दिली. यशस्वी जैस्वाल आणि मोहम्मद सिराज हे भारत वि बांगलादेश मालिकेतील दोन उत्कृष्ट फिल्डर ठरले.

टी दिलीप यांना भारतीय ड्रेसिंग रुमला संबोधित करताना उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत एकापेक्षा एक जबरदस्त झेल टिपल्याबद्दल कौतुक केले. त्यांनी स्लिप कॉर्डनमध्ये उभ्या असलेल्या खेळाडूंचेही कौतुक केले. भारतीय संघाने २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत बांगलादेशचा २-० असा धुव्वा उडवला.

हेही वाचा – Babar Azam: “आता वेळ आली आहे की…,” बाबर आझमने मध्यरात्री अचानक कर्णधारपदाचा दिला राजीनामा, वर्षभरात दुसऱ्यांदा सोडली कॅप्टन्सी

भारताची कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी

चेन्नई कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशचा २८० धावांनी पराभव केला. कानपूर कसोटीत अडीज दिवस सामना खेळवला गेला नाही त्यामुळे सामना ड्रॉ होईल अशी चिन्हे असलेला सामना भारतीय संघाने ७ विकेट्सने जिंकला. पावसामुळे पहिल्या दिवशी ३५ षटकांचा खेळ झाला. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी एकही चेंडू न टाकता खेळ रद्द करण्यात आला. यानंतर भारतीय संघाने आक्रमक फलंदाजी करत सर्व विक्रम मोडले आणि नंतर बांगलादेशला ५० षटकांत बाद केले. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना एक सत्र बाकी असतानाच विजय मिळवला. यासह भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत पहिले स्थान अधिक मजबूत केले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban test best fielder of the series yashasvi jaiswal mohammed siraj wins medal india dressing room video bdg