सध्या भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर असून दोन्ही संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेत बांगलादेशने दोन सामन्यानंतर २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. तसेच मालिकेतील तिसरा सामना बाकी आहे. अशात बांगलादेश क्रिकेट मंडळाने पहिल्या कसोटीसाठी आपला संघ जाहीर केला आहे. ज्यामध्ये सतरा खेळडूंचा समावेश असून शाकिब अल हसन संघाचे नेतृत्व करणार आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यात १४ तारखेपासून पहिली कसोटी खेळवली जाणार आहे. भारतासाठी अडचण म्हणजे कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त आहे. या दौऱ्यावर एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर टीम इंडियावर कसोटी मालिका जिंकण्याचे दडपण आहे. त्यामुळे पहिली कसोटी अत्यंत महत्त्वाची आहे. पहिला सामना जिंकणारा संघ मालिका गमावण्याच्या धोक्यातून बाहेर पडेल. तसेच बांगलादेशने ८ डिसेंबर रोजी त्यांच्या कसोटी संघाची घोषणा केली.
बांगलादेशचा पहिल्या कसोटीसाठी संघ:
महमुदुल हसन जॉय, एमडी मेहदी हसन मिराज, मोहम्मद नजमुल हुसेन शांतो, एमडी तैजुल इस्लाम, मोमिनुल हक, तस्कीन अहमद, यासिर अली चौधरी, सय्यद खालिद अहमद, एमडी मुशफिकुर रहीम, इबादत हुसेन चौधरी, शाकिब अल हसन (कर्णधार), एमडी शोरफुल इस्लाम, लिटन कुमार दास, झाकीर हसन, काझी नुरुल हसन सोहन, रेझाउर रहमान राजा आणि अनामुल हक बिजॉय