India vs Bangladesh, Asia Cup 2023: भारतीय क्रिकेट संघाने आशिया चषक २०२३च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पण त्याआधी शुक्रवारी कोलंबोमध्ये त्याचा सामना बांगलादेशशी होईल. या सामन्यात भारताच्या प्लेइंग-११ मध्ये अनेक बदल अपेक्षित आहेत. भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सुपर-४ चा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता होणार आहे. हा सामना दोन्ही संघांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा नाही कारण, बांगलादेश अगोदरच आशिया चषकातून बाहेर पडला आहे. दुसरीकडे, टीम इंडिया आपले दोन्ही सामने जिंकून फायनलला पोहचली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रिकबझच्या मते, बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताच्या प्लेइंग-११ मध्ये काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे, ज्यात आशिया कपमध्ये आतापर्यंत चारही सामने खेळलेले दोन वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती दिली जाऊ शकते. हे स्पष्ट दिसत आहे की, संघ व्यवस्थापन बुमराहला विश्रांती देऊ इच्छित आहे. तो १० महिन्यांच्या विश्रांतीनंतर येत असल्याने, त्याच्या कामाचा भार हलका करण्यासाठी संघात बदल होऊ शकतात. मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा संघात समावेश होण्याची शक्यता आहे.

मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा दोघांनाही संघात स्थान मिळण्याची अपेक्षा आहे. शार्दुल ठाकूरच्या जागी संघात समाविष्ट केलेला अक्षर पटेलला शेवटचा सामना खेळण्याची संधी मिळू शकते. दुसरी अशीही शक्यता आहे की, संघ व्यवस्थापन हार्दिक पांड्याला वगळण्याचा विचार करू शकते, अशा स्थितीत शार्दुलचे संघात पुनरागमन अपेक्षित आहे. तर फलंदाजीत सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांना संधी मिळू शकते.

हेही वाचा: SL vs PAK: ICC नंबर १ फलंदाज बाबर आझम २० वर्षाच्या खेळाडूसमोर हतबल, वेल्लालागेने दाखवला घरचा रस्ता; पाहा Video

भारत आणि बांगलादेश यांच्यातील हेड-टू-हेड आकडेवारी

भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण ३९ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारताने ३१ सामने जिंकले आहेत आणि बांगलादेश संघाने फक्त ७ सामने जिंकले आहेत. दुसरीकडे एका सामन्याचा निकाल लागला नाही. म्हणजेच एकदिवसीय सामन्यात टीम इंडिया बांगलादेशवर ३१-७ अशी वरचढ ठरली आहे.

एकूण सामने: ३९

भारत जिंकला: ३१

बांगलादेश विजयी: ७

निकाल क्रमांक: १

आशिया कपमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात एकूण १४ सामने झाले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने १३ सामने जिंकले आहेत तर बांगलादेशने फक्त एकच सामना जिंकला आहे. आशिया चषक स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यातील संघर्षाची मालिका १९८८ पासून सुरू झाली आणि २०१८ पर्यंत या दोघांमधील एकूण १४ लढतींपैकी बांगलादेश संघाने २०१२ मध्ये फक्त एकदाच ५ विकेट्सने विजय मिळवला होता. या १४ पैकी २०१६ मध्ये टी२० आशिया कपमध्ये दोन सामने झाले आणि ते दोन्ही सामने टीम इंडियाने जिंकले. एकूणच, भारत आणि बांगलादेश एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेत १२ वेळा आमनेसामने आले आहेत, त्यापैकी भारताने ११ आणि बांगलादेशने एक सामना जिंकला आहे.

हेही वाचा: Ben Stokes: १८२ धावांच्या तुफानी खेळीनंतर बेन स्टोक्सने जेसन रॉयची माफी मागितली; म्हणाला, “मी वर्ल्डकप खेळणार हे…”

आशिया कप २०२३ साठी भारतीय संघ

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराज, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban three changes in team india against bangladesh this will be the possible playing eleven avw