IND vs BAN Virat Kohli broke Sachin Tendulkar’s record of scoring 27000 runs : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सतत नवनवीन विक्रम करत आहे. खासकरून सचिन तेंडुलकरचे तर तो प्रत्येक विक्रम मोडण्यात व्यस्त आहे. आता कानपूरच्या ग्रीन पार्कमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७ हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. हा टप्पा गाठणारा भारताचा सचिन तेंडुलकर पहिला खेळाडू असला, तरी आता विराट कोहली त्याच्याही पुढे गेला आहे. हे लक्ष्य त्याने सर्वात जलद गाठले आहे. हा पराक्रम सचिन तेंडुलकरच्या तुलनेत खूपच कमी डावात केला आहे.

विराटने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला –

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७ हजार धावा पूर्ण करणारा सचिन तेंडुलकर पहिला होता. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला ६२३ डाव लागले होते. आता कोहलीबद्दल बोलायचे, तर त्याने केवळ ५९४ डावात २७ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. म्हणजे सचिन तेंडुलकरपेक्षा कमी डावात हा पराक्रम केला आहे. आतापर्यंत जगात फक्त तीनच फलंदाज होते, जे इतक्या धावा करू शकले होते, आता कोहली चौथा फलंदाज म्हणून या क्लबमध्ये दाखल झाला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७ हजारांहून अधिक धावा करणारे फलंदाज –

आतापर्यंत फक्त सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये म्हणजे एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय एकत्रितपणे सर्वाधिक धावा करण्याचे काम केले आहे. त्याने ६६४ सामने आणि ७८२ डाव खेळून ३४,३५७ धावा केल्या आहेत. यानंतर कुमार संगकाराचे नाव येते. त्याने ५९४ सामन्यांच्या ६६६ डावांमध्ये २८,०१६ धावा केल्या आहेत. रिकी पाँटिंगबद्दल बोलायचे झाले तर त्याने ५६० सामन्यांच्या ६६८ डावात २७४८३ धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीने आतापर्यंत ५३४ सामन्यांच्या ५९३ डावांमध्ये २७ हजारांचा आकडा पार केला आहे. रिकी पाँटिंगला मागे टाकण्यासाठी त्याला आणखी किती वेळ लागतो हे पाहायचे आहे.

हेही वाचा – IND vs BAN: रोहित शर्माचे पहिल्याच २ चेंडूंवर २ दणदणीत षटकार, १४७ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली असं काही

विराट कोहलीचे हुकले अर्धशतक –

विराट कोहलीने आपल्या २७ हजार धावा नक्कीच पूर्ण केल्या. पण त्याला आपले अर्धशतक पूर्ण करता आले नाही. बांगलादेशविरुद्ध कानपूरमध्ये कोहलीने ३५ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने चार चौकार आणि एक गगनभेदी षटकार लगावला. भारत विरुद्ध बांगलादेश सामना आता त्याच्या निर्णायक टप्प्यात आहे. त्यामुळे आता कसोटी क्रिकेटही टी-२० क्रिकेटच्या शैलीत खेळले जात आहे. भारतीय संघाने आपला पहिला डाव ९ बाद २८५ धावांवर घोषित केला. ज्यामुळे भारताला पहिला डावाच्या जोरावर ५२ धावांची आघाडी मिळाली.