IND vs BAN Virat Kohli equal Mohammad Azharuddin Record : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी सर्वोत्तम कामगिरी केली. मोहम्मद शमीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. दरम्यान, या सामन्यात स्टार खेळाडू विराट कोहलीनेही एक नवा विक्रम केला आहे. भारतासाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये क्षेत्ररक्षक म्हणून सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत विराटने माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोहलीने अझरुद्दीनच्या विक्रमाची केली बरोबरी –

विराट कोहलीने आता एकदिवसीय सामन्यात १५६ झेल घेतले आहेत. त्याने टीम इंडियाचे माजी दिग्गज कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांची बरोबरी केली आहे. या यादीत सचिन तेंडुलकरचेही नाव आहे, त्याने एकदिवसीय सामन्यात १४० झेल घेतले आहेत. यानंतर, राहुल द्रविड आणि सुरेश रैनाने अनुक्रमे १२४ आणि १०२ झेल घेतले आहेत.

एकदिवसीय सामन्यात भारतासाठी सर्वाधिक झेल घेणारे खेळाडू (यष्टीरक्षक नसलेले) :

  • मोहम्मद अझरुद्दीन -१५६
  • विराट कोहली – १५६
  • सचिन तेंडुलकर -१४०
  • राहुल द्रविड -१२४
  • सुरेश रैना – १०२

विराटला फलंदाजीतही दाखवावी लागेल चमक –

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट कोहलीला बॅटनेही धावा कराव्या लागतील. सर्व चाहते विराट कोहलीच्या कामगिरीवर लक्ष ठेवून असतील. आयसीसी स्पर्धेत विराट कोहलीची बॅट जोरदार तळपते हे सर्वांनाच चांगले माहिती आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मोठ्या सामन्यांचा खेळाडू विराट कोहली आणखी घातक बनतो. त्यांचे आकडे स्वतःच या वस्तुस्थितीचे साक्षीदार आहेत. विराटने आतापर्यंत आयसीसी एकदिवसीय स्पर्धेत ५० डावांमध्ये २३३६ धावा केल्या आहेत आणि तो या यादीत अव्वल स्थानावर आहे. मात्र, बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात २२ धावा करुन स्वस्तात बाद झाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban virat kohli equals the record of mohammad azharuddin in most catches for india in odi as fielder vbm