IND vs BAN Virat Kohli starts batting practice after during 1st test match: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईत खेळवला जात आहे. या सामन्याच्या दोन्ही डावात विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, मात्र त्याला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. आपल्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी विराट कोहलीने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी नेटमध्ये फलंदाजीचा सराव सुरु केला. भारताच्या दुसऱ्या डावात शुबमन-ऋषभ पंत क्रीजवर फलंदाजी करत होते आणि विराट कोहली नेटमध्ये सराव करत होता, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

भारताच्या दुसऱ्या डावात शनिवारी शुबमन गिल आणि ऋषभ पंत क्रीजवर फलंदाजी करत होते. त्यावेळी विराट कोहली ड्रेसिंग रूममध्ये बसण्याऐवजी नेटमध्ये फलंदाजी करताना दिसला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सरावादरम्यान कोहलीशिवाय यशस्वी जैस्वालही उपस्थित होता. यशस्वीने पहिल्या डावात अर्धशतक झळकावले होते, पण दुसऱ्या डावात तो खराब शॉट खेळून बाद झाला.

विराट कोहलीने सामना सुरु असताना नेटमध्ये सुरु केला सराव –

विराट कोहली बांगलादेशविरुद्धच्या दोन्ही डावात अपयशी –

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या डावात विराट कोहली फिरकीविरुद्ध बाद झाला होता. यासह कोहली २०२१ पासून २०व्यांदा फिरकीविरुद्ध बाद झाला आहे. दुसऱ्या डावात विराट कोहलीला मेहदी हसन मिराजने एलबीडब्ल्यू आऊट केले. मात्र, चेंडू बॅटच्या काठावर लागून पॅडला लागल्याचे रिप्लेमध्ये दिसून आले. पण विराटने डीआरएस न घेतल्याने त्याला माघारी परतावे लागले. त्याने आऊट होण्यापूर्वी गिलसोबत ३९ धावांची भागीदारी केली. कोहलीने ३७ चेंडूत १७ धावा केल्या आणि मायदेशात १२ हजार धावा पूर्ण करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला.

हेही वाचा – IND vs BAN 1st Test : शुबमन गिलने शतक झळकावत सचिन-विराटच्या ‘या’ खास विक्रमाची केली बरोबरी

कोहलीला पहिल्या डावात केवळ ६ धावा करता आल्या. त्याला पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन महमूदने बाद केले. २०२१ पासून कोहलीचा कसोटीतील रेकॉर्ड चांगला नाही. आशियातील १४ कसोटी सामन्यांमध्ये त्याने २९.७२ च्या सरासरीने ६५४ धावा केल्या आहेत. या काळात त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. २०२१ पासून कसोटीत कोहलीने ५१ डावांमध्ये १६६९ धावा केल्या आहेत आणि या कालावधीत त्याने आठ अर्धशतके आणि दोन शतके झळकावली आहेत.