India vs Bangladesh, World Cup 2023: वन डे वर्ल्ड कप २०२३मध्ये टीम इंडियाचा चौथा सामना बांगलादेशबरोबर आहे. पहिले तीन सामने जिंकल्यानंतर भारतीय संघाला सलग चौथ्या विजयाची नोंद करण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग सुकर होईल. त्याचवेळी बांगलादेशने अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता, मात्र त्यानंतर या संघाने दोन सामने गमावले आहेत. अशा स्थितीत यजमान भारताला हरवून बांगलादेश अस्वस्थ करण्याचा प्रयत्न करेल. बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशला सर्वात मोठा धक्का शाकिब अल हसनच्या रूपाने बसला. दुखापतीमुळे तो या सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी नझमुल हुसेन शांतोकडे कर्णधारपद सोपवले आहे.
बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाचा गेल्या काही वर्षांतील रेकॉर्ड खूपच खराब आहे. २०१९च्या विश्वचषकापासून दोन्ही संघांमध्ये एकूण चार एकदिवसीय सामने झाले आहेत. यातील तीन सामने बांगलादेशच्या नावावर आहेत. इशान किशनच्या द्विशतकामुळे भारताने एकमेव सामना जिंकला. आशिया चषक २०२३ मध्येही भारतीय संघ फक्त एकच सामना हरला होता आणि हा पराभव फक्त बांगलादेशविरुद्धच झाला होता. अशा परिस्थितीत टीम इंडियाला बांगलादेशला हलके घ्यायचे नाही.
आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता आणि बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वीच त्यांनी अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. अशा स्थितीत भारताच्या महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. याचा परिणाम भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे भारत या सामन्यात पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे.
पुण्याची खेळपट्टीची परंपरा पाहिली तर ती फलंदाजांसाठी उपयुक्त मानली जाते. गुरुवारीही तशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. मात्र, मागील सामन्यात शार्दुल ठाकूरने फक्त दोन षटके टाकली होती आणि खूप धावा दिल्या होत्या. या सामन्यातही पहिले षटक खूप महाग होते. त्याने तब्बल १८ धावा दिल्या. त्यामुळे फिरकीला थोडी पोषक असणारी ही खेळपट्टीवर अश्विनला वगळून रोहित शर्माने खूप मोठी चूक केली आहे का? अशी चर्चा समालोचक करत आहेत. पुण्याच्या स्टेडियममधील ही एक नवीन खेळपट्टी असून हंगामात प्रथमच वापरली जात आहे.
दोन्ही संघातील ११ खेळत आहे
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
बांगलादेश: लिटन दास, तनजीद तमीम, मेहदी हसन मिराज, नझमुल हसन शांतो (कर्णधार), मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), नसुम अहमद, तौहीद हृदोय, महमुदुल्लाह, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.