IND vs BAN Yashasvi Jaiswal broke George Headley’s record 89 years ago : चेन्नईच्या एमए चिदंबरमच्या खेळपट्टीवर यशस्वी जैस्वालची बॅट पुन्हा एकदा तळपली, जिथे रोहित-विराट आणि शुबमनसारखे फलंदाज स्वस्तात बाद झाले. या अवघड खेळपट्टीवर डावखुऱ्या सलामीवीराने शानदार अर्धशतक झळकावले. जैस्वालने पंतसोबत अर्धशतकी भागीदारी करत टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढले. त्याबरोबर या अर्धशतकाच्या जोरावर त्याने मोठा पराक्रम केला आहे. त्याने ८९ वर्षे जुना कसोटी विक्रम मोडीत काढत इतिहास लिहिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केल्यापासून यशस्वी जैस्वाल प्रत्येक सामन्यात कोणता ना कोणता विक्रम करत आहे. २२ वर्षीय युवा खेळाडूने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात एक मोठा पराक्रम केला आहे. तो ८९ वर्षांचा विक्रम मोडत मायदेशात पहिल्या १० डावात ७५० हून अधिक धावा करणारा कसोटी इतिहासातील पहिला फलंदाज ठरला आहे.

यशस्वी जैस्वालने मोडला ८९ वर्षांचा विक्रम –

यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या जॉर्ज हेडलीच्या नावावर होता, ज्याने १९३५ मध्ये १० कसोटी डावांनंतर मायदेशात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला होता. हेडलीने ७४७ धावा केल्या होत्या. जैस्वालने चेपॉक कसोटीच्या पहिल्या सत्रात हा विक्रम मोडला. आजच्या सामन्यापूर्वी यशस्वी जैस्वालने घरच्या कसोटी सामन्यातील ९ डावात ७१२ धावा केल्या होत्या. त्याने खेळाच्या पहिल्या सत्रात ३७ धावा करत हेडलीचा विक्रम मोडला.

हेही वाचा – IND vs BAN : ऋषभ पंतने स्फोटक खेळीने जिंकले कर्णधाराचे मन, रोहित शर्मा कौतुक करतानाचा VIDEO व्हायरल

घरच्या मैदानावर पहिल्या १० डावांनंतर सर्वाधिक कसोटी धावा करणारे फलंदाज –

७६८ – यशस्वी जैस्वाल (भारत)
७४७ – जॉर्ज हेडली (वेस्ट इंडिज)
७४३ – जावेद मियाँदाद (पाकिस्तान)
६८७ – डेव्ह हॉटन (झिम्बाब्वे)
६८० – सर व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडिज)

हेही वाचा – IND vs BAN : ‘शुबमन भारताचा बाबर आझम…’, बांगलादेशविरुद्ध शून्यावर बाद झाल्याने सोशल मीडियावर ट्रोल

सामन्याबद्दल बोलायचे तर भारताकडून यशस्वी जैस्वालने ११८ चेंडूत ९ चौकारांच्या मदतीन ५६ धावा केल्या. त्याचबरोबर ऋषभ पंतने ३९ धावांचे योगदान दिले. वृत्त लिहिपर्यंत भारताने ६८ षटकानंतर ६ बाद २७५ धावा केल्या आहेत. रवींद्र जडेजा ५१ आणि रविचंद्रन अश्विन ७५ धावांवर खेळत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban yashasvi jaiswal broke george headleys record 89 years ago against bangladesh 1st test match vbm