India vs England 1st ODI Live Updates, 12 July 2022 : भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना केनिंग्टन ओव्हलवर पार पडला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा १० गडी राखून पराभव केला. हा भारताचा इंग्लंडवरचा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडचा सगळा संघ ११०मध्ये गुंडाळला गेला आहे. जसप्रीत बुमराहच्या वादळासमोर इंग्लंडचे फलंदाज तग धरू शकले नाहीत. बुमराहने अवघ्या १९ धावा देत सहा बळी मिळवले. मोहम्मद शमीने तीन बळी घेऊन त्याला साथ दिली. भारताचा कर्णधार रोहित शर्मा ७६ तर शिखर धवन ३१ धावांवर नाबाद राहिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

England vs India 1st ODI Live Update : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यातील सर्व अपडेट्स

21:26 (IST) 12 Jul 2022
भारताने १० गडी राखून विजय मिळवला

पहिल्या एक दिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडवर १० गडी राखून विजय मिळवला.

21:22 (IST) 12 Jul 2022
भारताच्या १०० धावा पूर्ण

अठराव्या षटकामध्ये भारताच्या १०० धावा पूर्ण झाल्या आहेत. विजयासाठी ११ धावांची आवश्यकता आहे.

21:15 (IST) 12 Jul 2022
कर्णधार रोहित शर्माचे अर्धशतक पूर्ण

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४९ चेंडूत ५० धावा केल्या.

20:46 (IST) 12 Jul 2022
१० षटकांमध्ये भारताच्या बिनबाद ५८ धावा

पहिल्या १० षटकांमध्ये भारताच्या बिनबाद ५८ धावा झाल्या आहेत. भारताला विजयासाठी आणखी ५३ धावांची गरज आहे.

20:37 (IST) 12 Jul 2022
रोहित-धवनने सुरू केली फटकेबाजी

भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी फटकेबाजी सुरू केली आहे. धवन १४ तर रोहित २८ धावांवर खेळत आहे.

20:26 (IST) 12 Jul 2022
भारताची सावध सुरुवात

पहिल्या पाच षटकांमध्ये भारताच्या बिनबाद १४ धावा झाल्या आहेत. रोहित शर्मा (१३) आणि शिखर धवन (१) मैदानावरती उपस्थित आहेत.

20:10 (IST) 12 Jul 2022
भारतीय फलंदाजीला सुरुवात

१११ धावांचे लक्ष्य घेऊन भारतीय संघ मैदानात उतरला आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवनने डावाची सुरुवात केली.

19:42 (IST) 12 Jul 2022
इंग्लंडचा डाव ११० डावांवर गुंडाळला

पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा डाव ११० डावांवर गुंडाळला गेला आहे. जसप्रीत बुमराहने सहा बळी घेतले.

19:28 (IST) 12 Jul 2022
जसप्रीत बुमराहचा ‘फाइव्ह विकेट हॉल’

भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने आजच्या सामन्यात शानदार गोलंदाजी करून पाच बळी मिळवले आहेत.

19:21 (IST) 12 Jul 2022
इंग्लंडचे शतक पूर्ण

२२व्या षटकामध्ये इंग्लंडच्या संघाचे शतक धावफलकावर लागले आहे. इंग्लंडने २१.५ षटकांमध्ये आठ बाद १०० धावा केल्या आहेत.

19:12 (IST) 12 Jul 2022
२० षटकांमध्ये इंग्लंडच्या आठ बाद ८४ धावा

इंग्लंडचा डाव गडगडला असून २० षटकांमध्ये आठ बाद ८४ धावा झाल्या आहेत.

18:58 (IST) 12 Jul 2022
मोहम्मद शमीचे एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५० बळी पूर्ण

भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५० बळी पूर्ण केले. क्रेग ओव्हरटन त्याचा १५०वा बळी ठरला.

18:57 (IST) 12 Jul 2022
इंग्लंडचा आठवा गडी बाद

क्रेग ओव्हरटनच्या रुपात इंग्लंडचा आठवा गडी बाद झाला आहे. मोहम्मद शमीने त्याला त्रिफळाचित केले.

18:48 (IST) 12 Jul 2022
कर्णधार जोस बटलर बाद

इंग्लंडचा सातवा गडी बाद झाला असून कर्णधार जोस बटलर तंबूत परतला आहे. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवने त्याचा झेल टिपला. इंग्लंडची अवस्था सात बाद ५९ अशी झाली आहे.

18:43 (IST) 12 Jul 2022
इंग्लंडचा सहावा गडी बाद

मोईन अलीच्या रुपात इंग्लंडचा सहावा गडी बाद झाला आहे. प्रसिद्ध कृष्णाने त्याला माघारी धाडले. मोईन अलीने १४ धावा केल्या. इंग्लंडची अवस्था सहा बाद ५३ अशी झाली आहे.

18:22 (IST) 12 Jul 2022
१० षटकांमध्ये इंग्लंडच्या पाच बाद ३० धावा

पहिल्या १० षटकांमध्ये इंग्लंडच्या पाच बाद ३० धावा झाल्या आहेत. जसप्रीत बुमराहने चार बळी घेतले.

18:13 (IST) 12 Jul 2022
इंग्लंडची फलंदाजी सपशेल ढेपाळली

इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर माना टाकल्या आहेत. अवघ्या २६ धावांमध्ये इंग्लंडचे पाच गडी बाद झाले आहेत. लियाम लिव्हिंगस्टोनच्या रुपात संघाला पाचवा झटका बसला आहे.

18:01 (IST) 12 Jul 2022
इन-फॉर्म फलंदाज जॉनी बेअरस्टो बाद

जसप्रीत बुमराहने आजच्या सामन्यातील आपला तिसरा बळी मिळवला आहे. त्याने इंग्लंडचा इन-फॉर्म फलंदाज जॉनी बेअरस्टोला अवघ्या सात धावांवर बाद केले आहे. इंग्लंडची अवस्था चार बाद १७ अशी झाली आहे.

17:56 (IST) 12 Jul 2022
पाच षटकांमध्ये इंग्लंडच्या तीन बाद १७ धावा

प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडची सुरुवात फारच वाईट झाली आहे. पहिल्या पाच षटकांमध्ये इंग्लंडच्या तीन बाद १७ धावा झाल्या आहेत.

17:47 (IST) 12 Jul 2022
इंग्लंडचा तिसरा गडी बाद

भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करून इंग्लंडची सलामीची फळी माघारी धाडली आहे. बेन स्टोक्स भोपळाही न फोडता माघारी गेला आहे.

17:43 (IST) 12 Jul 2022
जो रूट शून्यावर बाद

जसप्रीत बुमराहने भेदक गोलंदाजी करून यजमानांना डावाच्या सुरुवातीलाच दोन झटके दिली आहेत. जो रूट शून्यावर बाद झाला आहे. इंग्लंडची अवस्था दोन बाद सहा अशी झाली आहे.

17:40 (IST) 12 Jul 2022
इंग्लंडला पहिला झटका

जसप्रीत बुमराहने इंग्लंडला पहिला झटका दिला. सलामीवीर जेसन रॉय शून्यावर बाद झाला.

17:31 (IST) 12 Jul 2022
इंग्लंडच्या डावाला सुरुवात

यजमान इंग्लंडच्या फलंदाजीला सुरुवात झाली आहे. सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो मैदानात आले आहेत.

17:23 (IST) 12 Jul 2022
विराट कोहलीच्या जागी श्रेयस अय्यरची वर्णी

मांडीतील स्नायूंच्या दुखापतीमुळे विराट कोहली आजचा एकदिवसीय सामना खेळू शकणार नाही. त्याच्या जागी श्रेयस अय्यरला संधी मिळाली आहे.

17:10 (IST) 12 Jul 2022
विराट कोहली पहिल्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.

इंग्लंडचा संघ : जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, लियाम लिव्हिंगस्टोन, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), मोईन अली, डेव्हिड विली, ब्रायडन कार्स, क्रेग ओव्हरटन, रीस टॉपली.

17:05 (IST) 12 Jul 2022
नाणेफेक जिंकून भारताचा गोलंदाजीचा निर्णय

भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

16:42 (IST) 12 Jul 2022
केनिंग्टन ओव्हल मैदान इंग्लंडसाठी लकी!

केनिंग्टन ओव्हल मैदान इंग्लंडसाठी लकी असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या सात वर्षांमध्ये या मैदानावर झालेला एकही एकदिवसीय सामना इंग्लंडचा संघ हारलेला नाही.