केनिंग्टन ओव्हल येथे झालेला भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना ऐतिहासिक ठरला. भारताने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये प्रथमच इंग्लंडचा १० गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना अक्षरश: लोटांगण घालण्यास भाग पाडले. जसप्रित बुमराहने सहा गडी बाद केले तर, तीन गडी बाद करून मोहम्मद शमीने त्याला भक्कम साथ दिली. या दरम्यान, शमीच्या नावे एका विक्रमाची नोंद झाली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने सर्वात जलद १५० धावांचा टप्पा पार केला आहे.

आजच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर शमीचा १५०वा बळी ठरला. शमीने ८० एकदिवसीय सामने खेळत १५० बळींचा टप्पा गाठला. या कामगिरीमुळे त्याने माजी भारतीय गोलंदाज अजित आगरकरचा विक्रम मोडला आहे. अजित आगरकरने ९७ एकदिवसीय सामन्यांमध्ये १५० बळी घेतले होते.

जागतिक क्रिकेटचा विचार केला तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५० बळींचा टप्पा पार करून शमीने अफगाणिस्तानच्या राशीद खानची बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने ७७ सामने आणि सकलेन मुश्ताकने ७८ सामन्यांमध्ये अशी कामगिरी केलेली आहे.

रविचंद्रन अश्विनची केली बरोबरी

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात मोहम्मद शमीने सात षटके गोलंदाजी केली. त्यात त्याने ३१ धावा देऊन ती बळी घेतले. त्यामुळे त्याला आजच्या सामन्यात १५० धावांचा टप्पा पार करता आला. तो दीडशे एकदिवसीय बळी घेणारा भारताचा १४वा गोलंदाज ठरला आहे. याबाबत त्याने विकेट्सच्या रविचंद्रन अश्विनची (१५१ बळी) बरोबरी केली आहे.

Story img Loader