IND vs ENG Ravindra Jadeja created history by dismissing Joe Root : भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेला नागपुरात सुरुवात झाली आहे. या सामन्यात इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट तब्बल १५ महिन्यांनंतर वनडे फॉरमॅटमध्ये परतला. पण हा सामना त्याच्यासाठी चांगला गेला नाही. भारतीय संघातील दिग्गज लेफ्ट आर्म स्पिनरने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्याला ३१ चेंडूत केवळ १९ धावा करता आल्या आणि जडेजाच्या फिरकीत तो झेलबाद झाला. यासोबतच एक आश्चर्यकारक विक्रमही बनला आहे. खरं तर, जो रूट हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जडेजाविरुद्ध सर्वाधिक वेळा बाद झालेला फलंदाज ठरला आहे. जडेजाने १२व्यांदा त्याची शिकार केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रवींद्र जडेजाने जो रुटला केले सर्वाधिक वेळा बाद –

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आपली तयारी मजबूत करण्यासाठी दोन्ही संघ वनडे मालिकेत घाम गाळत आहेत. पहिल्या सामन्यात इंग्लिश संघाच्या सलामीवीरांनी वेगवान सुरुवात केली होती. पण बेन डकेट आणि फिल सॉल्टनंतर संघाने सातत्याने विकेट गमावण्यास सुरुवात केली. इंग्लंडच्या फलंदाजीचा कणा मानल्या जाणाऱ्या जो रूटलाही फार काही करता आले नाही. रवींद्र जडेजाने त्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये चौथ्यांदा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२व्यांदा बाद केले. जडेजाने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा रूटला बाद केले आहे. रूटशिवाय त्याने स्टीव्हन स्मिथला सर्वाधिक ११ वेळा आणि अँजेलो मॅथ्यूजला १० वेळा बाद केले आहे.

रवींद्र जडेजाच्या ६०० विकेट्स पूर्ण –

संपूर्ण सामन्यात रवींद्र जडेजाने शानदार गोलंदाजी केली. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी तो लयीत दिसत आहे. त्याने नागपूर एकदिवसीय सामन्यात ९ षटके टाकली आणि २.९ च्या इकॉनॉमीने फक्त २६ धावा देऊन ३ बळी घेतले. जो रूटसोबतच त्याने जेकब बेथेल आणि आदिल रशीदलाही आपले बळी बनवले. यादरम्यान त्याने एक मेडन ओव्हरही टाकला. यासोबतच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० विकेट्सही पूर्ण केल्या आहेत. या सामन्यापूर्वी त्याने ५९७ विकेट्स घेतल्या होत्या.

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे एकदिवसीय मालिकेत इतिहास घडवला आहे. तो भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. यादरम्याने त्याने जेम्स अँडरसनच्या विक्रम मोडला आहे. याआधी हा विक्रम जेम्स अँडरसनच्या नावावर होता. ज्याने ४० विकेट्स घेतल्या होत्या. मात्र आता रवींद्र जडेजाने ४१ विकेट्स घेत त्याला मागे टाकले.

भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक विकेट्स:

१ – रवींद्र जडेजा : २७ सामन्यात ४१ विकेट्स
२ – जेम्स अँडरसन: ३ सामन्यात ४० विकेट्स
३ – अँड्र्यू फ्लिंटॉफ: ३० सामन्यांत ३७ विकेट्स
४ – हरभजन सिंग : २३ सामन्यात ३६ विकेट्स
५ – जवागल श्रीनाथ: २१ सामन्यात ३५ विकेट्स