भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना केनिंग्टन ओव्हलवर होत आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवत अप्रतिम कामगिरी केली आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मह शमी यांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचे फलंदाज तग धरू शकले नाही. या दरम्यान, भारतीय यष्टीरक्ष ऋषभ पंतने कमालीचे यष्टीरक्षण केले.

यष्टीरक्षक ऋषभ पंतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने अगदी माशाप्रमाणे सूर मारला आहे. जसप्रीत बुमराहने आपल्या पहिल्या षटकामध्ये जो रूट आणि जेसन रॉय यांना शून्यावर बाद केले. त्यानंतरचे षटक मोहम्मद शमीचे होते. या षटकात शमीने बेन स्टोक्सला बाद केले. यावेळी यष्टीरक्षक ऋषभ पंतने हवेमध्ये सूर मारत एका हाताने स्टोक्सचा अप्रतिम झेल घेतला.

त्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यासमोर इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली आहे. त्यांच्या स्विंग चेंडूचा सामना करण्यात जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स यांसारखे दिग्गज अपयशी ठरले आहेत.

Story img Loader