India vs England t20 : कसोटी मालिका पार पडल्यानंतर भारत आणि इंग्लंड आता टी २० सामन्यांमध्ये आपापली क्षमता सिद्ध करण्यासाठी जोर लावणार आहे. दोन्ही संघांदरम्यान तीन सामन्याची टी २० मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना साउथॅम्प्टनमधील ‘द रोज बाऊल’ स्टेडियममध्ये पार पडला. ५० धावांनी भारताने हा सामना जिंकला. परिणामी भारताला तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळाली आहे. निर्धारित २० षटकांमध्ये भारताने आठ बाद १९८ धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून इंग्लंडला सर्वबाद १४८ धावांपर्यंत मजल मारता आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

England vs India 1st T20 Live Update : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी २० सामन्याबद्दल सर्व ताजी माहिती

22:52 (IST) 7 Jul 2022
दीपक हुडाचे सलग दोन षटकार

दीपक हुडाने मोईन अलीच्या षटकामध्ये सलग दोन षटकार ठोकले.

22:44 (IST) 7 Jul 2022
भारताला पहिला झटका

मोईन अलीच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा बाद झाला. जोस बटलरने यष्ट्यांमागे त्याचा झेल घेतला. रोहितने १४ चेंडूंमध्ये २४ धावा केल्या.

22:39 (IST) 7 Jul 2022
दुसऱ्या षटकामध्ये रोहितचे सलग दोन चौकार

दुसऱ्या षटकामध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माने रीस टॉपली सलग दोन चौकार लगावले.

22:31 (IST) 7 Jul 2022
भारताच्या फलंदाजीला सुरुवात

भारतीय कर्णधार रोहित शर्मा ईशान किशनच्या साथीने सलामीसाठी मैदानात उतरला आहे.

22:12 (IST) 7 Jul 2022
आजच्या सामन्यातील दोन्ही संघ

भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, दीपक हुडा, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.

इंग्लंड संघ – जोस बटलर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), जेसन रॉय, डेव्हिड मलान, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रूक, सॅम कुरेन, क्रिस जॉर्डन, टायमल मिल्स, मॅथ्यू पार्किंसन, रीस टॉपली

22:08 (IST) 7 Jul 2022
नाणेफेक जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय

भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

21:59 (IST) 7 Jul 2022
अर्शदीप सिंग करणार पदार्पण

आजच्या टी २० सामन्यात अर्शदीप सिंग पदार्पण करत आहे. कर्णधार रोहित शर्माने त्याला कॅप दिली.

https://platform.twitter.com/widgets.js

21:38 (IST) 7 Jul 2022
भारत आणि इंग्लंड यांच्यातील २०वा टी २० सामना

भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा २०वा आंतरराष्ट्रीय टी २० सामना आहे. आतापर्यंत झालेल्या १९ सामन्यांपैकी १० भारताने तर नऊ इंग्लंडने जिंकलेले आहेत.

21:24 (IST) 7 Jul 2022
व्हीव्हीएस लक्ष्मणच्या मार्गदर्शनाखाली खेळणार भारत

आयर्लंड दौऱ्यासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण हे भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी २० सामन्यातही तेच ही जबाबदारी पार पाडणार आहेत.

21:22 (IST) 7 Jul 2022
रोहित शर्मा करणार मैदानावर पुनरागमन

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा कोविड १९ मधून बरा झाला आहे. इंग्लंडविरुद्ध होत असलेल्या पहिल्या टी २० सामन्यातून तो मैदानावर परत येत आहे.