India vs England t20 : कसोटी मालिका पार पडल्यानंतर भारत आणि इंग्लंड आता टी २० सामन्यांमध्ये आपापली क्षमता सिद्ध करण्यासाठी जोर लावणार आहे. दोन्ही संघांदरम्यान तीन सामन्याची टी २० मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना साउथॅम्प्टनमधील ‘द रोज बाऊल’ स्टेडियममध्ये पार पडला. ५० धावांनी भारताने हा सामना जिंकला. परिणामी भारताला तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळाली आहे. निर्धारित २० षटकांमध्ये भारताने आठ बाद १९८ धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून इंग्लंडला सर्वबाद १४८ धावांपर्यंत मजल मारता आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

England vs India 1st T20 Live Update : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी २० सामन्याबद्दल सर्व ताजी माहिती

02:07 (IST) 8 Jul 2022
१४८ धावांत आटोपला इंग्लंडचा डाव

भारताने दिलेले १९९ धावांचे लक्ष्य पार करण्यात इंग्लंडला अपयश आले आहे. इंग्लंडचा सर्वसंघ १९.३ षटकांमध्येच गारद झाला.

01:58 (IST) 8 Jul 2022
अर्शदीप सिंगला पदार्पणाच्या सामन्यात मिळाला बळी

आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय टी २० सामना खेळणाऱ्या अर्शदीप सिंगला पदार्पणाच्या सामन्यात बळी मिळाला. त्याने रीस टॉपलीला बाद केले.

01:49 (IST) 8 Jul 2022
इंग्लंडचा आठवा फलंदाज बाद

टायमल मिल्सच्या रुपात इंग्लंडचा आठवा फलंदाज बाद झाला. हर्षल पटेलने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.

01:39 (IST) 8 Jul 2022
इंग्लंडचा सातवा गडी बाद

हार्दिक पंड्याचा चेंडू फटकावण्याच्या नादात सॅम कुरेन चार धावा करून बाद झाला. इंग्लंडची अवस्था सात बाद १०६ अशी झाली आहे.

01:33 (IST) 8 Jul 2022
युझवेंद्र चहलला मिळाला दुसरा बळी

खेळपट्टीवर जम बसवण्याच्या प्रयत्नात असलेल्या मोईल अलीला युझवेंद्र चहलने त्रिफळाचित केले. इंग्लंडची अवस्था सहा बाद १०० अशी झाली आहे.

01:30 (IST) 8 Jul 2022
हॅरी ब्रूकच्या रुपात इंग्लंडचा पाचवा गडी बाद

हॅरी ब्रूकच्या रुपात इंग्लंडचा पाचवा गडी बाद झाला आहे. युझवेंद्र चहलच्या चेंडूवर सुर्यकुमार यादवने त्याचा अप्रतिम झेल टिपला.

01:25 (IST) 8 Jul 2022
मोईन अली आणि हॅरी ब्रूकचा डाव सावरण्याचा प्रयत्न

सुरुवातीचे चार फलंदाज झटपट बाद झाल्याने मोईन अली आणि हॅरी ब्रूक इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.

01:23 (IST) 8 Jul 2022
१० षटकांमध्ये इंग्लंडच्या चार बाद ७२ धावा

१९९ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडने १० षटकांमध्ये चार बाद ७२ धावा केल्या आहेत.

01:13 (IST) 8 Jul 2022
हॅरी ब्रुकला जीवदान

हॅरी ब्रुकला जीवदान १६ धावांवर असताना जीवदान मिळाले. यष्टीरक्षक दिनेश कार्तिककडून त्याचा झेल सुटला.

01:04 (IST) 8 Jul 2022
इंग्लंडचा चौथा गडी स्वस्तात बाद

जेसन रॉय १६ चेंडूत अवघ्या चार धावा करून माघारी परतला आहे. इंग्लंडची अवस्था चार बाद ३३ अशी झाली आहे.

00:56 (IST) 8 Jul 2022
हार्दिक पंड्याला मिळाला दुसरा बळी

बँटिंग पावप्लेमध्ये इंग्लंडने तीन गडी गमवाले आहेत. हार्दिक पंड्याला एकाच षटकामध्ये दोन बळी मिळाले. लियाम लिव्हिंगस्टोन शून्यावर बाद झाला.

00:52 (IST) 8 Jul 2022
इंग्लंडचा दुसरा गडी बाद

डेव्हिड मिलानच्या रुपात इंग्लंडचा दुसरा गडी बाद झाला. हार्दिक पंड्याच्या चेंडूवर तो बाद झाला. इंग्लंडच्या दोन बाद २७ धावा झाल्या आहेत.

00:48 (IST) 8 Jul 2022
पहिल्या चार षटकांमध्ये इंग्लंडच्या २३ धावा

पहिल्या चार षटकांमध्ये इंग्लंडने एक बाद २३ धावा केल्या आहेत. अर्शदीप सिंगच्या षटकामध्ये सलग दोन चौकार मारण्यात आले.

00:42 (IST) 8 Jul 2022
इंग्लंडची संथ सुरुवात

जोस बटलर पहिल्याच षटकात बाद झाल्यानंतर इंग्लंडने सावध पवित्रा घेतला आहे. रॉय आणि डेव्हिड मलान संथ खेळत आहेत.

00:31 (IST) 8 Jul 2022
इंग्लंडला पहिला झटका

भुवनेश्वर कुमारने इंग्लंडला पहिला झटका दिला. कर्णधार जोस बटलर शून्यावर बाद झाला.

00:26 (IST) 8 Jul 2022
इंग्लंडच्या फलंदाजीला सुरुवात

भारताने दिलेले १९९धावांचे आव्हान पार करण्यासाठी इंग्लंडचे सलामीवीर मैदानात उतरले आहेत. कर्णधार जोस बटलर आणि जेसन रॉय यांनी डावाची सुरुवात केली.

00:18 (IST) 8 Jul 2022
भारताच्या आठ बाद १९८ धावा

निर्धारित २० षटकांमध्ये भारताने आठ बाद १९८ धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी १९९ धावा कराव्या लागणार आहेत.

00:13 (IST) 8 Jul 2022
कार्तिक पाठोपाठ हर्षल पटेलही बाद

चोरटी धाव काढण्याच्या नादात हर्षल पटेल धावबाद झाला.

00:11 (IST) 8 Jul 2022
दिनेश कार्तिक बाद

धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जाणारा दिनेश कार्तिक ११ धावा करून बाद झाला.

00:02 (IST) 8 Jul 2022
हार्दिक पंड्याच्या रुपात भारताचा सहावा गडी बाद

हार्दिक पंड्या अर्धशतक करून बाद झाला. त्याने ३३ चेंडूत ५१ धावा केल्या.

23:58 (IST) 7 Jul 2022
हार्दिक पंड्याचे अर्धशतक पूर्ण

हार्दिक पंड्याने ३० चेंडूंमध्ये शानदार अर्धशतक पूर्ण केले. हे त्याच्या आंतरराष्ट्रीय टी २० कारकिर्दीतील पहिलेच अर्धशतक ठरले आहे.

23:56 (IST) 7 Jul 2022
भारताचा पाचवा गडी बाद

अक्षर पटेल १७ धावा करून बाद झाला. जेसन रॉयने त्याचा अप्रतिम झेल घेतला. भारताच्या पाच बाद १७१ धावा झाल्या आहेत.

23:46 (IST) 7 Jul 2022
१५ षटकांमध्ये भारताच्या चार बाद १५७ धावा

१५ षटकांमध्ये भारताच्या चार बाद १५७ धावा झाल्या आहेत. अशीच फटकेबाजी सुरू राहिली तर निर्धारित २० षटकांमध्ये भारत दोनशेपेक्षा जास्त धावा करू शकेल.

23:37 (IST) 7 Jul 2022
१३ षटकात तीन चौकार

१३ षटकात लिव्हींगस्टोनच्या गोलांदाजीवर भारतीय फलंदाजांनी तीन चौकार लगावले.

23:32 (IST) 7 Jul 2022
सुर्यकुमार यादव माघारी

सुर्यकुमार यादव १९ चेंडूमध्ये ३९ धावा करून बाद झाला. भारताने ११.४ षटकांमध्ये चार बाद १२६ धावा केल्या आहेत.

23:18 (IST) 7 Jul 2022
दहा षटकांमध्ये भारताचा धावफलक शंभरीपार

भारतीय फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी करत दहा षटकांमध्ये धावफलक शंभरीपार नेला आहे.

23:12 (IST) 7 Jul 2022
भारताचा तिसरा गडी बाद

दीपक हुडाच्या रुपात भारताचा तिसरा गडी बाद झाला. क्रिस जॉर्डनच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. त्याने १७ चेंडूंमध्ये झटपट ३३ धावा केल्या. त्यामध्ये तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे.

23:04 (IST) 7 Jul 2022
सात षटकांमध्ये भारताच्या दोन बाद ७५ धावा

भारतीय फलंदाजांनी फटकेबाजी करत सात षटकांमध्ये धावफलक दोन बाद ७५ धावांपर्यंत आणला आहे.

22:55 (IST) 7 Jul 2022
पहिल्या पाच षटकांमध्ये भारताच्या ५० धावा

पहिल्या पाच षटकांमध्ये भारताच्या दोन बाद ५० धावा झाल्या. सुर्यकुमार यादव आणि दीपक हुडा मैदानावरती फलंदाजी करत आहेत.

22:54 (IST) 7 Jul 2022
ईशान किशनच्या रुपात भारताचा दुसरा गडी बाद

सलामीवीर ईशान किशन आठ धावा करून बाद झाला. मोईन अलीच्या गोलंदाजीवर पार्किंसनने त्याचा झेल घेतला.