Ollie Pope highest scorer by a foreign batsman in the second innings in India : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावात इंग्लंड संघाने शानदार पुनरागमन केले. पहिल्या डावात २४६ धावांत गारद झालेल्या संघाने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ७७ षटकांत ६ बाद ३१६ धावा केल्या. त्याच्याकडे १२६ धावांची आघाडी आहे. याचे संपूर्ण श्रेय उपकर्णधार ऑली पोपला जाते. तो १४८ धावा करुन क्रीजवर उभा आहे.
इंग्लंड संघाच्या या चमकदार कामगिरीने १२ वर्षांचा दुष्काळ संपवला. २०१३ नंतर कोणत्याही परदेशी संघाने भारतात दुसऱ्या डावात ३०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. ऑली पोप १४८ धावा करून क्रीजवर आहे. २०१२ नंतर भारतात दुसऱ्या डावात परदेशी फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कुकने १२ वर्षांपूर्वी अहमदाबादमध्ये १७६ धावांची खेळी साकारली होती.
इंग्लंडने नागपूरमध्ये ३५२ धावा केल्या होत्या –
यानंतर पोपची ही खेळी आली आहे. या दोन्ही फलंदाजांनी पहिल्या कसोटीत ही खेळी केली. २०१२ मध्ये भारताने ती मालिका गमावली होती. त्यानंतर घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. अलीकडेच, भारतातील दुसऱ्या डावात ३०० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या परदेशी संघांबद्दल बोलायचे झाल्यास, २०१२ मध्ये नागपूरमध्ये इंग्लंडने ४ विकेट्सवर ३५२ धावा करून डाव घोषित केला होता.
हेही वाचा – IND vs ENG 1st Test : जो रुटने अवघ्या दोन धावा करत रचला इतिहास, भारताविरुद्ध केला सर्वात मोठा विक्रम
भारतीय फिरकीपटूंविरुद्ध केल्या धावा –
२०१२ मध्येच इंग्लंडने अहमदाबादमध्ये ४०६ धावा केल्या होत्या. याशिवाय २०११ मध्ये कोलकात्यात वेस्ट इंडिजने ४६३ धावा केल्या होत्या. २०१० मध्ये हैदराबादमध्ये न्यूझीलंडने ८ विकेट्सवर ४४८ धावांवर डाव घोषित केला होता. देशांतर्गत भूमीवर भारताच्या यशात फिरकीपटूंनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या तीन भारतीय फिरकी गोलंदाजांविरुद्ध इंग्लंडने आक्रमक रणनीती अवलंबली आहे.
चौथ्या दिवसाबद्दल बोलायचे, तर इंग्लंड संघाने दुसऱ्या डावात ९१ षटकानंतर ७ बाद ३७६ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ऑली पोप १७५ आणि टॉम हार्टली १९ धावांवर फलंदाजी करत आहेत. त्यामुळे संघाने १८६ धावांची आघाडी घेतली आहे.